स्वच्छतेच्या सेवेतून नागरिकांचा त्रास टाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:42 AM2017-09-18T01:42:17+5:302017-09-18T01:42:46+5:30
प्रत्येक क्षेत्रामध्ये सेवाकार्य कर्तव्याच्या भावनेतून करून नागरिकांना ‘स्वच्छता ही सेवा’ त्रासदायक होणार नाही, याकडे अधिकार्यांनी लक्ष देऊन कर्तव्याचे पालन करावे, असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी केले. अकोला भाजपातर्फे महानगरात ५४ ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमाचा व जिल्ह्यात १२८ ठिकाणी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमाच्या संकल्पांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रत्येक क्षेत्रामध्ये सेवाकार्य कर्तव्याच्या भावनेतून करून नागरिकांना ‘स्वच्छता ही सेवा’ त्रासदायक होणार नाही, याकडे अधिकार्यांनी लक्ष देऊन कर्तव्याचे पालन करावे, असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी केले. अकोला भाजपातर्फे महानगरात ५४ ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमाचा व जिल्ह्यात १२८ ठिकाणी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमाच्या संकल्पांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार गोवर्धन शर्मा, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, अनिल गावंडे, उपमहापौर वैशाली शेळके उपस्थित होत्या.
यावेळी राहुल देशमुख, निकिता रेड्डी, सुनील राजे, डॉ. विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, धनंजय गिरीधर, डॉ. किशोर मालोकार, गीतांजली शेगोकार, दीप मनवाणी, सारिका जैस्वाल, राजेंद्र गिरी, मिलिंद राऊत, अमोल गोगे, नीलेश निनोरे, सुरेश अंधारे, उकंडराव सोनोने, चंदा शर्मा, हिरा कृपलानी, सुजाता अहिर, सुनीता अग्रवाल, शारदा ढोरे, सुमनताई गावंडे, पवन पाडिया, सतीश ढगे, सुनील क्षीरसागर, तुषार भिरड, विजय इंगळे, अजय शर्मा, माधुरी बडोणे, आम्रपाली उपर्वट, अनिता चौधरी, जयंत मसने, प्रशांत अवचार, नाना कुलकर्णी, आरती घोगलिया,अनिल गरड, आशिष पवित्रकार, प्रवीण जगताप, संदीप पाटील, अनिल नावकार, नीलेश ठेवा, अनुप गोसावी उपस्थित होते.
शिवाजी पार्क, राजराजेश्वर मंदिर, बसस्थानक, भाजीबाजार, सिंधी कॅम्प प्रभाग १३, ५, ८, २0, १२ या भागात साफसफाई अभियान, वृक्षारोपण, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली.
समाज निमार्णात सदैव कार्यरत राहू - शर्मा
समाजसेवेचे व मानवतेचे व्रत जात-पात, पंथ, धर्म न पाहता, मन भेद न करता पक्षांनी दिलेल्या आदेशाला कोणाच्याही नेतृत्वात राष्ट्र व समाज निर्माणात कार्यरत राहू, असे आमदार शर्मा म्हणाले. प्रत्येक समाजाच्या कल्याणासाठी विकासाचा आलेख प्रधानमंत्री मोदी उंचावत असून, देशाची प्रतिमा विदेशातसुद्धा उंचावण्याची कृती त्यांनी केली आहे. त्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनात शिपाई म्हणून कार्यरत असल्याचा अभिमान आहे, असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. यावेळी बबलू पळसकर, वसंत मानकर, सूरज शेळके, प्रमोद टेकाडे, सुजित ठाकूर, हंसराज सिसोदिया, वसंत बाछुका, कृष्णा शर्मा, उमेश गुजर, अभिजित गोलडे, अभिजित बांगर, लता गावंडे, राहुल गुजर, पंढरी दोरकर, गणेश श्रीनाथ, सतीश येवले, राम खरात, सुनील बाठे, सिद्धार्थ शर्मा, महेंद्र ओहेकर उपस्थित होते.