खासगी शिक्षण संस्थांना आवर घाला, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:23 AM2021-09-04T04:23:08+5:302021-09-04T04:23:08+5:30
उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, कोरोनाच्या संकटामुळे जनसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडून गेले आहे. अशातच खासगी शिक्षण संस्थांकडून पालकांना संपूर्ण फी ...
उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, कोरोनाच्या संकटामुळे जनसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडून गेले आहे. अशातच खासगी शिक्षण संस्थांकडून पालकांना संपूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावला जात आहे, जर फी नाही भरली तर विद्यार्थ्यांना वर्ग कक्षेत बसू दिले जात नाही, ऑनलाईन वर्गातून काढून टाकण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होत आहे. अशा अवस्थेमुळे पालकांसमोर खूप मोठा आर्थिक प्रश्न निर्माण होत आहे. मुंबई हायकोर्टाने व राज्य सरकारने फीबाबत खासगी शाळांना दिलेले आदेशाची अंमलबजावणी खासगी शिक्षण संस्थांकडून करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. अशा संस्थांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक सुनील लशुवाणी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.