जमावबंदी आदेशामुळे आदिवासी वसतिगृहांना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:33 AM2021-02-18T04:33:44+5:302021-02-18T04:33:44+5:30
मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेऊ लागली आहे. काेराेनाच्या प्रसाराला आळा घालण्याच्या उद्देशातून शासनाने कठाेर ...
मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेऊ लागली आहे. काेराेनाच्या प्रसाराला आळा घालण्याच्या उद्देशातून शासनाने कठाेर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्या अनुषंगाने अकाेला व बुलडाणा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत. याचा परिणाम आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांवर हाेऊन शाळा व वसतिगृहांना टाळे लावण्याची वेळ ओढवली आहे. यामुळे अतिदुर्गम व दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांची परवड हाेणार असल्याचे चित्र आहे.
तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गैरसाेय
अकाेला,वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाचे एकूण १६ वसतिगृह आहेत. अनुदानित आश्रमशाळा १९ असून आठ शासकीय आश्रमशाळा आहेत. मध्यंतरी नववी व बारावीचे वसतिगृहे सुरु करण्यात आली हाेती. जमावबंदी आदेशामुळे पुन्हा एकदा आश्रमशाळा व वसतिगृह बंद केली जाणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेणार आहे.