कीर्तनातून कोरोना रुग्णांचे प्रबोधन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:19 AM2021-04-20T04:19:56+5:302021-04-20T04:19:56+5:30
प्रशासनाच्या माध्यमातून रविवारी व सोमवारी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून रुग्णांचे प्रबोधनातून मनोरंजन केले. कोरोना रुग्णांचे मनोबल वाढण्याकरिता प्रशासन उपक्रम राबवीत ...
प्रशासनाच्या माध्यमातून रविवारी व सोमवारी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून रुग्णांचे प्रबोधनातून मनोरंजन केले.
कोरोना रुग्णांचे मनोबल वाढण्याकरिता प्रशासन उपक्रम राबवीत आहे. रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अकोट येथील तहसीलदार नीलेश मडके, डॉ. अनंत तेलंग यांच्या पुढाकारातून विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांच्या हरी कीर्तनाचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कीर्तनामध्ये विलगीकरण कक्षात शासनाच्या नियम, अटींचे पालन करून रुग्णांसमोर कीर्तन सादर करण्यात आले. रुग्णांनी कीर्तनाचा आनंद घेतला. कीर्तनामध्ये महाराजांनी, महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव कमी करण्याकरिता सत्ताधारी पक्ष ,विरोधी पक्ष, प्रशासन, सर्व सामाजिक, धार्मिक संघटना शर्तीचे प्रयत्न करीत आहेत आणि त्यामध्ये जनतेचे सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण भगवान यांच्या जीवनातसुद्धा संकट आले. परंतु, त्यांनी संकटाचा सामना केला. आपणही वैश्विक महामारीमध्ये डगमगून न जाता आलेल्या संकटाला खंबीरपणे तोंड द्यावे, असे सांगत महाराजांनी रुग्णांचे मनोबल वाढविले. अकोट पॅटर्न सरकारने महाराष्ट्रामध्ये राबवून महाराष्ट्रातील कीर्तनकारांना कोरोना रुग्णांचे मनोबल वाढवण्याकरिता कीर्तन सेवेची संधी द्यावी, असे शेटे महाराज म्हणाले. यावेळी डॉ. अनंत तेलंग, धनंजय सपकाळ, अभिषेक परमार्थ, नीता नागे, सुषमा भगत, संजय भाऊ शेळके, अरविंद शेगोकर, नितीनआप्पा गोंडगरे, विवेक गोंडगरे, विलास महाराज कराड, विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज ऊकर्डे, संतोष महाराज घुगे, गजाननराव मोडक, अजाबराव कुचेकर, किशोर कुटे उपस्थित होते.
फोटो: मेल फोटोत