कृषी वीज बिल भरण्यासाठी जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:16 AM2021-02-08T04:16:33+5:302021-02-08T04:16:33+5:30
महावितरण अकोट विभागाचे उपव्यवस्थापक वि. एफ. उईके, अकोट उपविभागाचे साहायक लेखापाल एस. एस. पांडे, विजय गोरे, उपकार्यकारी ...
महावितरण अकोट विभागाचे उपव्यवस्थापक वि. एफ. उईके, अकोट उपविभागाचे साहायक लेखापाल एस. एस. पांडे, विजय गोरे, उपकार्यकारी अभियंता जी .एस अग्रवाल उपस्थित होते. अग्रवाल यांनी कृषिपंप वीज धोरणाबाबत माहिती देताना, कृषी ग्राहकांच्या सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज १०० टक्के माफ करून मूळ थकबाकीच वसुलीसाठी ग्राह्य धरण्यात येईल. थकबाकीवर वीज आयोगाने मान्यता दिलेल्या व्याजदरानुसार आकारणी करून थकबाकी निश्चित करण्यात आली आहे. सदर योजना तीन वर्षांसाठी असून ग्राहकांनी पहिल्या वर्षात योजनेचा लाभ घेतल्यास ५० टक्क्यांपेक्षा जास्त थकबाकी माफीचा फायदा असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना ३ वर्षापर्यंत चालू वीज बिल भरणे आवश्यक आहे. या धोरणांतर्गत रोहित्र स्तरावरील सर्व कृषी वीज ग्राहकांनी १०० टक्के चालू वीज बिल व थकबाकी भरल्यास कृषिपंपांच्या चालू बिलाच्या रकमेवर १० टक्के सवलत मिळेल, असे मार्गदर्शन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
फोटो :