‘साथरोगमुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहीम’ आजपासून

By admin | Published: June 2, 2015 02:07 AM2015-06-02T02:07:14+5:302015-06-02T02:07:14+5:30

अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावात होणार अंमलबजावणी.

'Awareness free water quality awareness campaign' from today | ‘साथरोगमुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहीम’ आजपासून

‘साथरोगमुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहीम’ आजपासून

Next

अकोला: पावसाळ्यापूर्वी पिण्याच्या पाण्याबाबत जनजागृती करण्याकरिता जिल्ह्यात ह्यसाथ रोगमुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहीमह्ण मंगळवार, २ जूनपासून जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पावसाळ्यात उद्भवणार्‍या साथ रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पिण्याच्या पाण्याची गुणवत्तासंबंधी साक्षरता वाढविणे आणि गाव स्तरावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया गतिमान करण्याकरिता शासनाच्या पाणीपुरवठा व स्वचछता विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यात २ ते १५ जून या कालावधीत साथ रोगमुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात २ ते ५ जून या कालावधीत पाणी गुणवत्ताविषयी प्रबोधन आणि गृह भेटीवर भर दिला जाणार आहे. गावागावांत बैठका घेऊन भजनी मंडळ, युवक मंडळ, महिला बचत गटांना पाणी गुणवत्ताविषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच रासायनिक तपासणीत आढळून आलेल्या गुणवत्ता बाधित स्रोतांना लाल रंग व योग्य असलेल्या स्रोतांना हिरवा रंग दिला जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात ६ ते १0 जून या कालावधीत पिण्याचे पाणी स्रोतांच्या परिसरात स्वच्छता करणे, तसेच जोखीमग्रस्त स्रोत असलेल्या गावांमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन प्रबोधन करण्यात येणार आहे. मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यात ११ ते १५ जून या कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा पुरेसा साठा ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देणे व पावडर वापराबाबतचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले जाईल. ब्लिचिंग पावडरची गुणवत्ता तपासणी, साठवण व निगा, पाणी स्रोतांचे ग्रामस्थांच्या मदतीने शुद्धीकरण व साठवण टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेची जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये अंमलबजावणी करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी पंचायत समिती स्तरावरून, पंचायत व आरोग्य विभाग, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता कक्षामार्फत करण्यात येणार आहे.

Web Title: 'Awareness free water quality awareness campaign' from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.