रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रासेयोद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:23 AM2021-02-17T04:23:47+5:302021-02-17T04:23:47+5:30
रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एल. येऊल, डॉ. एम. जे. साबू, डॉ. एन. एन. चोटिया, डॉ. एन. एम. गुट्टे ...
रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एल. येऊल, डॉ. एम. जे. साबू, डॉ. एन. एन. चोटिया, डॉ. एन. एम. गुट्टे यांच्या नेतृत्वात या रस्ता सुरक्षा जनजागृती मध्ये रासेयो स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी विविध चौकांमधे रॅली, विविध फलक, बॅनर लावून जनजागृती केली. तसेच महाविद्यालय परिसर व सिव्हिल लाइन चौकात पथनाट्याद्वारे हेल्मेट न वापरल्याने, मंद्यधुंद होऊन गाडी चालवल्यास किती दुष्परिणाम होतात, हे दाखवले. वाहने हळू व जबाबदारीने चालवावी, हेल्मेट घालून वाहने चालवावीत, याबाबत विविध ठिकाणी जनजागृती केली.
यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक प्रफुल्ल वसंत मेश्राम उपस्थित होते. तसेच पथनाट्यामध्ये हर्षल श्रीनगर, तेजस घोडे, विशाल धनोकार, राहुल उंबरकर, रेणुका ढोले, सुजित राठोड, मयूर मावळे, अश्विनी कुळकर्णी, साक्षी गावंडे, पायल तोष्णीवाल, अंजली चंपे, श्रद्धा वानखडे, लक्ष्मी मानकर, मेघा झारेकर, मंगला खोबरखेडे, आकाश खडसे यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.