महिलेच्या विनयभंग प्रकरणी आझाद खानविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 05:47 PM2020-10-26T17:47:29+5:302020-10-26T17:47:52+5:30
आझाद खान याने या महिलेचा अनेक दिवसांपासून पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आझाद खान अलियार खान याने सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांधी रोडवर त्याच्या मालकीच्या असलेल्या आझाद कॉम्प्लेक्समध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी रात्री उशीरा अटक केली. रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. मात्र आझाद खानचा चालक व एक नोकर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडपुरा परिसरातील रहिवासी आझाद खान अलियार खान याचे गांधी रोडवर आजाद नावाने कॉम्प्लेक्स असून या कॉम्प्लेक्समध्ये एक खासगी मेस चालविणारी महिला डबे घेऊन येते. आझाद खान याने या महिलेचा अनेक दिवसांपासून पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने आझाद खानला भीक न घातल्याने आझाद खानने त्याचा चालक एका नोकराला महिलेचा पाठलाग करण्यास सांगितले. यावरून चालक व नोकराने महिलेवर पाळत ठेवली मात्र हा प्रकार महिलेच्या लक्षात आले. यावरून महिलेने छळ असह्य झाल्यानंतर शनिवारी रात्री सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात आजाद खानसह त्याचा चालक व नोकराविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी आजाद खान त्याचा चालक व नोकराविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 354 504 506 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आजाद खानला तातडीने अटकही केली. मात्र न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. तर चालक व नोकर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनीका राउत, शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी कोतवाली पोलिसांनी केली.