७१६ कोटी रुपयांचे ‘बॅरेज’ विजेअभावी ठरले ‘वांझोटे’!
By admin | Published: January 5, 2017 02:16 AM2017-01-05T02:16:19+5:302017-01-05T02:16:19+5:30
सिंचनाचा तिढा कायम; ११७ कोटींचा विजेचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित
सुनील काकडे
वाशिम, दि. ४- जिल्हय़ातील सिंचनाचा वाढता अनुशेष कमी करण्यासाठी शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी ७१६.४२ कोटी रुपये खचरून बॅरेज उभे केले. मात्र, कोट्यवधी लीटर पाणी अडूनही विजेअभावी हे पाणी सिंचनासाठी वापरता येणे अशक्य ठरत असून, विजेसंदर्भातील सुविधांचा ११७ कोटी रुपयांचा प्रस्तावही शासन स्तरावर अद्याप प्रलंबित आहे.
जिल्ह्यात सिंचनाचा सुमारे ५00 कोटी रुपयांचा अनुशेष आजही कायम आहे. तो दूर करण्यासाठी तद्वतच सिंचनाअभावी शेतकर्यांची होणारी ससेहोलपट थांबविण्याकरिता शासनाने पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ह्यबॅरेजेसह्णची कामे केली आहेत. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५,५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २,१३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. डिसेंबर २0१५ मध्ये या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करून शासनाने ७१६.४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळेच ११ ही बॅरेजची कामे वेळेत पूर्ण होऊन ठिकठिकाणी पाणी अडविणे शक्य झाले आहे. असे असताना बॅरेज परिसरातील विजेचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यामुळे कोट्यवधी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या ह्यबॅरेजह्णची उपयोगिता शून्य ठरत आहे.
प्रकल्प परिसरात गरज आहे या सुविधांची
विजेची समस्या सोडविण्यासाठी गणेशपूर, जयपूर आणि नारेगाव या तीन ठिकाणी ३३/११ ह्यकेव्हीह्णचे तीन वीज उपकेंद्र उभारणे आवश्यक आहे. त्यावर ५ ह्यएमव्हीएह्णचे ६ ट्रान्सफार्मर आणि १00 ह्यकेव्हीएह्णचे ९४२ ट्रान्सफार्मर बसवावे लागणार आहेत. याशिवाय अडोळी आणि वाई येथे ५ ह्यएमव्हीएह्णचे २ अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसविणे, नव्याने तयार होणार्या उपकेंद्रापर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी ३३/११ ह्यकेव्हीह्णची विद्युत वाहिनी टाकण्यासह इतरही बरीच कामे करावी लागणार आहेत. तसा सविस्तर प्रस्ताव महावितरणने शासनाकडे सादर केला आहे.
जलसंपदा विभागाने दिवसरात्र एक करून पैनगंगा नदीवरील बॅरेजची कामे पूर्ण करून घेतली. दज्रेदार स्वरूपात झालेल्या या कामांमुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविणे शक्य झाले. मात्र, जोपर्यंत शेतकर्यांना वीज कनेक्शन पुरविले जाणार नाहीत, तोपर्यंत या पाण्याचा सिंचनासाठी कुठलाच फायदा होणार नाही.
जयंत शिंदे,
कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम
पैनगंगा नदीवरील ११ ही बॅरेजेससह इतर प्रकल्प परिसरात विजेसंदर्भातील सुविधा पुरविण्यासाठी महावितरणने ११७ कोटी रुपयांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. निधी मंजूर होताच प्रस्तावित कामे केली जातील.
डी.आर. बनसोडे
अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम