बाबासाहेब आंबेडकर देशाचे भाग्यविधाते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:40+5:302020-12-07T04:13:40+5:30
अकोला: महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना देऊन, देशातील सर्वांना समानतेचा अधिकार दिला व माणूस म्हणून जगण्याचे बळ ...
अकोला: महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना देऊन, देशातील सर्वांना समानतेचा अधिकार दिला व माणूस म्हणून जगण्याचे बळ दिले. त्यामुळे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे भाग्यविधाते असल्याचे प्रतिपादन बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीव्दारा संचालित सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रूपचंद अग्रवाल यांनी रविवारी केले.
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.आर.डी. सिकची यांनी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. या कार्यक्रमास हिंदी विभागप्रमुख डाॅ. सुरेशकुमार केसवानी, अर्थशास्त्र विभागप्रमुख डाॅ. प्रसन्नजीत गवई, संगीत विभागप्रमुख डाॅ. अनिरुध्द खरे, प्रा. सुभाष दामोदर, डाॅ. स्नेहल शेंबेकर, डाॅ. काैमुदी बर्डे, डाॅ. दिनकर उंबरकर, डाॅ. रतन राठोड, डाॅ. अभयसिंग साेळंके, डाॅ. अशोक सोनोने, डाॅ. नीरज लांडे, डाॅ. गोविंद एललकार, प्रा. प्रशांत ठाकरे, महादेव सोळंके, डाॅ. भारती पटनायक, डाॅ. कैलास वानखडे, डाॅ. उमेश चापके, डाॅ.एस.पी. गायगोळ, डाॅ.बी.जी. जोगदंड, प्रा. अमोल गावंडे, प्रा. नाना भडके, डाॅ. संतोष कुळकर्णी, प्रा. प्रमोद मारकंडे, प्रा. सुनीता बन्ने, कैलास अमृतकर, राजेश सोनोने, सोहम नावकार, रंजना टाले, गणेश झटाले, गजानन कळंबे, भरत लोहकपुरे आदी उपस्थित होते.
............फोटो.................