बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताचे दिवस दूर नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:41 AM2017-11-28T01:41:41+5:302017-11-28T01:46:11+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली राज्यघटना  सर्वव्यापी असून, या देशातील सर्वच घटकांचा विचार करणारी आहे. त्यांनी  नोंदवून ठेवलेली मार्गदर्शक तत्त्वे, सामाजिक, आर्थिक कल्याणकारी स्वप्न,  विचारांना आता कोणालाही जास्त काळ टाळता येणार नाही. म्हणूनच  बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताचे दिवस आता दूर नाहीत, असे  विचार प्रा.  रणजित मेश्राम यांनी सोमवारी अकोला येथे मांडले.

Babasaheb's dream days are not far away! | बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताचे दिवस दूर नाहीत!

बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताचे दिवस दूर नाहीत!

Next
ठळक मुद्देप्रा. रणजित मेश्राम यांचे विचार संविधान दिनानिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली राज्यघटना  सर्वव्यापी असून, या देशातील सर्वच घटकांचा विचार करणारी आहे. त्यांनी  नोंदवून ठेवलेली मार्गदर्शक तत्त्वे, सामाजिक, आर्थिक कल्याणकारी स्वप्न,  विचारांना आता कोणालाही जास्त काळ टाळता येणार नाही. म्हणूनच  बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताचे दिवस आता दूर नाहीत, असे  विचार प्रा.  रणजित मेश्राम यांनी सोमवारी अकोला येथे मांडले.
भारतीय बौद्ध महासभा, भारिप-बहुजन महासंघ, सम्यक विद्यार्थी आंदोलन,  प्रबुद्ध भारत संयोजन समिती व आरक्षण बचाव कृती समिती अकोलाच्यावतीने  संविधान दिनानिमित्त प्रमिलाताई ओक हॉल येथे २७ नोव्हेंबर रोजी आयोजित  ‘भारतीय संविधान व आजची परिस्थिती’ या विषयावर प्रा. मेश्राम बोलत होते.  बाबासाहेब संविधान सभेत पोहोचले कसे, हा घटनारू पी ऐतिहासिक दस्तावेज  भारतीयांच्या मनपटलावर कोरू न ठेवला कसा, अशा अनेक मुद्यांना त्यांनी स् पर्श केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत पोहोचू न देण्यासाठी  तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी किती विरोध केला, याची तारखेसह दाखले  दिली. बाबासाहेब संविधान सभेत पोहोचू नये म्हणून महाराष्ट्रासह देशातील सर्व  दरवाजे बंद करण्यात आली होती. पण, बंगालचे जोगींदरनाथ मंडल यांच्या  प्रयत्नाने बाबासाहेब अखेर बंगाल विधानसभेतून संविधान सभेवर पोहोचले.  बाबासाहेबांनी या सभेत केलेल्या भाषणानंतर, त्यांचा विविध विषयांवर  असलेला सखोल अभ्यास, वेगवेगळ्य़ा देशातील घटनांची इत्थंभूत असलेली  माहिती जाणून घेताना शेवटी बाबासाहेबांच्या विचारांपुढे तत्कालीन नेत्यांना  झुकावे लागले, असे ते म्हणाले. घटना समितीवर पोहोचल्यांनतर घटनेच्या  कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. मसुदा समिती नेमण्यात आली; पण यातील  सर्व सदस्य वेगवेगळ्य़ा कारणाने समितीवर कायम राहू शकले नाहीत. त्यामुळे  एकट्या बाबासाहेबांना हा मसुदा तयार करावा लागला. या ताणाचा त्यांच्या  प्रकृतीवर परिणाम झाला. पण, या देशाचे भलं करण्यासाठी त्यांनी प्राणाची बाजी  लावली. सबंध लोकांना, बहुसंख्याकांना न्याय, अधिकारी मिळावे, यासाठी  अविरत काम करू न देशाला अनमोल राज्यघटना दिली. त्यांना मिळालेल्या  संधीचं त्यांनी सोनं केलं.
बाबासाहेबांना शेतीचे राष्ट्रीयीकरण करायचे होते, जड उद्योगासह विविध  क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करायचे होते; पण त्यावेळच्या  संस्थानिक, भांडवलदार,  नेत्यांनी ते होऊ दिले नाही. पण, बाबासाहेबांनी याचा समावेश मार्गदर्शक तत्त्वा त केलाच. आजच सर्व सरकारी क्षेत्राच्या खासगीकरणाचा सपाटा सुरू  असून,  तरुण रोजगाराच्या शोधात फिरतो आहे. असे असताना सामाजिक समरसतेच्या  गोष्टी सुरू  आहेत, दुसरीकडे भांडवली समाजरचनेची अंमलबजावणी होताना  दिसत आहे. बाबासाहेबांनी घटना लागू करण्याच्या एक दिवस आधी २५  नोव्हेंबर १९४९ ला संसदेत घटनेवर विचार व्यक्त करताना  म्हणाले होते, की  देश अत्यंत विसंगतीपूर्ण वातावरणात प्रवेश करतो आहे. एकीकडे राजकीय  समता म्हणजे प्रत्येकाला एक व्यक्ती एक मताचा अधिकार मिळाला. पण,  दुसरीकडे सामाजिक, आर्थिक विषमता वेगाने वाढत असल्याचे धोके त्यांनी  त्याचवेळी सांगितले होते. यावर विचार करण्याची वेळ आली आहे; अन्यथा  विषमतेने त्रस्त बहुसंख्याक हा राजकीय डोलारा उद्ध्वस्त करतील, अशी भी ती व्यक्त केली. 
बाबासाहेबांचा उदो उदो करणार्‍यांना आता  बहुसंख्याकांना जास्त दिवस विषम तेच्या गर्तेत ठेवता येणार नाही. त्याअनुषंगाने विचार करण्याची गरज असल्याचे  ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष रवींद्र दारोकार  गुरुजी होते. विचारपीठावर भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम  सिरस्कार, कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे,  माजी मंत्री डॉ.डी.एम.भाडे, डी.एन. खंडारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीर खॉ  अमानउल्ला खॉ, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, अरुंधती  सिरसाट, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, शंकरराव इंगळे,  रमेश तायडे, मनोहर पंजवाणी, प्रसेनजित गवई, श्रीकांत ढगेकर, प्रदीप वान खडे, राहुल दहिकर, बुद्धरत्न इंगोले, अमोल सिरसाट, प्रभाताई सिरसाट,  अमोल बी. सिरसाट, लबडे गुरुजी आदींची उपस्थिती होती. तसेच सम्राट  सुरवाडे, नितेश किर्तक,आशिष शिराळे, वंदना वासनिक, रामा तायडे, पराग  गवई आदींची उपस्थिती होती.

Web Title: Babasaheb's dream days are not far away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.