जिल्हा परिषदेतील ‘बाबूगिरी’ संपणार!

By admin | Published: May 20, 2014 01:12 AM2014-05-20T01:12:32+5:302014-05-21T00:15:27+5:30

अकोला जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे टेबल बदलण्याची कार्यवाही २२ मे रोजी समुपदेशनाने केली जाईल.

'Babujiri' in Zilla Parishad will end! | जिल्हा परिषदेतील ‘बाबूगिरी’ संपणार!

जिल्हा परिषदेतील ‘बाबूगिरी’ संपणार!

Next

अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सोयीच्या टेबलांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांची ह्यबाबूगिरीह्ण संपविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समितीसह जिल्हा परिषद कार्यालयात एकाच टेबलावर वर्षानुवर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्‍यांचे टेबल बदलण्याची कार्यवाही २२ मे रोजी समुपदेशनाने केली जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांच्या बदलीचे धोरण शासनाने निश्‍चित केले आहे. सार्वत्रिक बदली प्रक्रियेशिवाय ही कार्यवाही केली जाणार असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीतील बहुतांश ह्यबाबूंह्णना आवडीचा टेबल सोडावा लागणार आहे

Web Title: 'Babujiri' in Zilla Parishad will end!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.