बाळापुरातील कचरा फेकला जातो नदी पात्रात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 08:42 PM2017-11-23T20:42:46+5:302017-11-23T20:43:54+5:30
नगर परिषदेमार्फत शहरातील घनकचरा उचलण्यासाठी मागील वर्षीपेक्षा दुप्पट दराने निविदा दिल्यावरही कचरा नदी काठावर मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येत असल्याने प्रदूषण होत आहे. घनकचर्याच्या दुर्गंधीने डासांची उ त्पत्ती वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर - नगर परिषदेमार्फत शहरातील घनकचरा उचलण्यासाठी मागील वर्षीपेक्षा दुप्पट दराने निविदा दिल्यावरही कचरा नदी काठावर मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येत असल्याने प्रदूषण होत आहे. घनकचर्याच्या दुर्गंधीने डासांची उ त्पत्ती वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील घनकचरा उचलण्यासाठी मायक्रो इन्वहॉर्मेंट सोल्युशन प्रा.लि. नाशिक यांना दरमहा ४ लाख ५0 हजार रुपये नगर परिषदेमार्फत दिले जातात. मागील वर्षी सचिन शर्मा बाळापूर यांना दरमहा २ लाख २९ हजार ६00 रु. देण्याचे कंत्राट दिले होते. नगर परिषदेने शासकीय आय.टी.आय.च्या मागील जागेत घनकचरा जमा करून खतनिर्मिती करण्यासाठी शासनाकडून मोठय़ा निधीतून केवळ मशिनरी बसवण्यात आली. तिचा कुठलाही उपयोग खतनिर्मि तीसाठी झाला नाही. घनकचर्यापासून खत निर्मिती व घनकचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल. यासाठी शासनाने मोठा निधी दिला; परंतु या निधीचाही दुरुपयोग होत आहे. घनकचरा कंत्राटदार संबंधित घनकचरा साइटवर न टाकता नदी काठाने टाकत असल्याने नगर परिषदेचा पैसा पाण्यात जात आहे.
घनकचर्यापासून खत निर्मिती झाल्यास शेतकर्यांसाठी लाभाचा ठरेल व नगर परिषदेचेही उत्पन्न वाढणार आहे. मात्र, याकडे नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. शहराच्या दोन्ही बाजूंनी नदी काठावर कचर्याचे मोठ-मोठे ढीग कालेखानीपुरा, ब्राम्हणवेस, मोमीनपुरा, कसाईवेस बाजारपेठ , बारादारी अनिकट, कासारखेड, बौद्धधर्मीय स्मशानभूमी, अशा अनेक ठिकाणी कंत्राटदाराचे कर्मचारी कचरा फेकत आहेत. या ठिकाणी बर्याच वेळा हा कचरा पेटवून देऊन नष्ट केला जातो. त्यामुळे, नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागतो. घनकचर्यामुळे शहरातील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. नदी काठावर मोठ-मोठे कचर्याचे ढीग वाढत आहेत. काठावरील घनकचरा नदीपात्रात जाऊन नदीपात्रात घाण वाढत आहे. याच घाणीची दुर्गंधी पसरत आहे. मोठय़ा प्रमाणात डासांचा उच्छाद वाढून शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
शहरातील घनकचरा उचलून, त्यासंबंधित कंत्राटदाराला नियोजित खतनिर्मिती साईटवर नेऊन टाकण्याचा करार आहे. वारंवार कंत्राटदाराला कचरा शहराच्या आसपास टाकू नये, अशा सूचना लेखी पत्र देऊन दिल्या जातात. त्यावरही कत्राटदार नदीकाठावर कचरा टाकत असल्यास कारवाई करू.
-जी.एस. पवार, मुख्याधिकारी न.प. बाळापूर
शहरातील घनकचरा अर्धवट उचलून तो शहराबाहेर न नेता मन नदीच्या लोटणापूरनजीक दलित वस्ती निधीतून बांधलेल्या रस्ता संरक्षण भिंतीच्यामध्ये टाकत आहे. बौद्धधर्मीय स्मशानभूमीतही घनकचरा टाकण्यात येत आहे. नगर परिषद प्रशासनाने दखल न घेतल्यास भारिप-बमसं व नागरिकाच्यावतीने जन आंदोलन उभारू.
- नितीन उमाळे, शहर अध्यक्ष भारिप-बमसं बाळापूर
फोटो आहे