बाळ वारंवार डायपर ओलो करतेय; तातडीने डॉक्टरांना दाखवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:29+5:302021-07-24T04:13:29+5:30
काय आहेत लक्षणे? वजन कमी होणे. खूप भूक लागते. वारंवार लघवीला जावे लागते. उपचार न केल्यास उलट्या, बेशुद्ध होणे. ...
काय आहेत लक्षणे?
वजन कमी होणे.
खूप भूक लागते.
वारंवार लघवीला जावे लागते.
उपचार न केल्यास उलट्या, बेशुद्ध होणे.
पाणी जास्त पितो.
आई-वडिलांना डायबिटीस असेल तर ही घ्यावी काळजी
आई-वडिलांना किंवा दोघांपैकी एकाला डायबिटीस असेल, तर अनुवांशिकरीत्या मुलांना डायबिटीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, त्यांच्यातील डायबिटीस हा टाइप-२ राहण्याची शक्यता असते. पालकांपासून मुलांना डायबिटीसचा धोका टाळण्यासाठी अर्ली डायग्नोसिस करणे महत्त्वाचे असल्याचे बालरोग तज्ज्ञांनी सांगितले. म्हणजेच मूल जन्माला आल्यानंतरच अशा पालकांनी मुलांमधील डायबिटीसचे निदान करण्याची गरज आहे.
लहान मुलांमध्ये डायबिटीस असल्यास त्यांचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते, मात्र या मुलांमध्ये जेवणाचे प्रमाण जास्त असते. तसेच पाणी पिण्याचेही प्रमाणही जास्त दिसून येते. महिन्यातून एखादा रुग्ण या प्रकारचा येतो. डायबिटीसची लक्षणे दिसून आल्यास पालकांनी मुलांना तातडीने बालरोग तज्ज्ञांना दाखवावे.
- डॉ. विनीत वरठे, बालरोग तज्ज्ञ, जीएमसी, अकोला
गंभीर अवस्थेत हे रुग्ण आढळतात. श्वसनाला त्रास होणे, धाप लागणे ही लक्षणे देखील या रुग्णांमध्ये दिसून येतात. व्हायरल इन्फेक्शनमुळे आजारी असलेल्या बालकांमध्ये इन्शुलिन निर्मिती प्रक्रिया प्रभावित होऊ शकते. त्यामुळेच लहान मुलांमध्ये हा प्रकार दिसून येताे. बहुतांश रुग्ण हे ५ वर्षांआतील आढळून येतात.
- डॉ. अनुप चौधरी, बालरोग तज्ज्ञ, अकोला