... अन् प्रहारनं अक्कांचं घर बांधलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 07:43 PM2021-08-16T19:43:46+5:302021-08-16T19:45:04+5:30
महाराष्ट्राचं भूषण असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं बालपण ज्या वाड्यावर गेलं. अकोला जिल्ह्यातील सुकोडा येथील अक्काजी देशमुख यांच्या घरी त्यांनी बालपण घावलवं. विशेष म्हमजे गुलाबराव महाराज यांचेही बालपन याच अक्काजी देशमुख यांच्या वाड्यावर गेले.
अकोला - राज्यमंत्री बच्चू कडू नेहमीच गोरगरीब, कष्टकरी आणि शेतकरी जनतेचा आवाज बनून कार्य करतात. समाजातील पीडित आणि कष्टी लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी धडपड असते. बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडूनही तेच काम जोमाने पुढे नेण्यात येत आहे. त्यामुळेच, त्यांच्या कार्याचं सोशल मीडियातही कौतुक होतं. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं एका गरीब आजीबाईला छत देऊन मोठा आधार दिला आहे. उतरत्या वयात आजीला हक्काचा पक्का निवारा प्रहारनं दिलाय.
महाराष्ट्राचं भूषण असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं बालपण ज्या वाड्यावर गेलं. अकोला जिल्ह्यातील सुकोडा येथील अक्काजी देशमुख यांच्या घरी त्यांनी बालपण घावलवं. विशेष म्हमजे गुलाबराव महाराज यांचेही बालपन याच अक्काजी देशमुख यांच्या वाड्यावर गेले. आज त्या अक्कांच्या कुटुंबावर कठिण परिस्थिती आली आहे. अकोल्यातील सुकोडा येथे त्या राहतात, त्यांचे घर अत्यंत मोडकळीस आले असून पावसाळ्यात त्यांची मोठी तारांबळ उडते. अक्काबाईंचं घर पाहिल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात प्रहार कार्यकर्त्यांनी अक्काबाई देशमुख यांना नवं घर बांधून दिलं.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गुलाबराव महाराज यांचे बालपन ज्या वाड्यावर गेले अक्काजी देशमुख यांच्या परिवारावर कठिण परिस्थिती आली. अकोला, सुकोडा येथे ते राहतात, या पावसात घर मोडकळीस आले.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) August 16, 2021
प्रहार कार्यकर्त्यांना त्यांना स्वत: घर बांधुन दिले. काल या घराचा वास्तू प्रवेश करण्यात आला. pic.twitter.com/vqqbB2VIAP
प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्यांना स्वत: घर बांधुन दिले. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी वास्तूचा गृहप्रवेश करण्यात आल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देताना, फोटोही शेअर केले आहेत. विशेष म्हणजे अक्काबाईंच्याच हस्ते त्यांनी या घराचं उद्घाटन केलं. अक्काबाईंच्या आठवणी सांगताना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.