बोरगाव मंजू-अकोल वाट रस्त्याची दुरवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:47+5:302021-04-25T04:18:47+5:30
अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू-सिसा बोदरखेड, बाभुळगाव शिवारातील पैलवान बाबा दर्गा-गुडधी असा हा अकोला शहराला जोडणारा ब्रिटिश कालीन जुना अकोल ...
अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू-सिसा बोदरखेड, बाभुळगाव शिवारातील पैलवान बाबा दर्गा-गुडधी असा हा अकोला शहराला जोडणारा ब्रिटिश कालीन जुना अकोल वाट रस्ता आहे. या रस्त्याचे काही भागात डांबरीकरण झाले आहे, परंतु काही ठिकाणी मुरूम टाकण्यात आला आहे. बाभूळगाव-सिसा बोंदरखेड, वाशिंबा शिवार-बोरगाव मंजूपर्यंत एकूण सात किलोमीटर अंतर असलेला ब्रिटिशकालीन जुना अकोल वाट रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, शेतकऱ्यांसह ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती झाल्यास बोरगाव मंजू, वाशिंबा, सिसा बोदरखेड, बाभुळगाव जहाँगीर येथील शेतकऱ्यांना अकोला जाण्यासाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अकोल वाट रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. बोरगाव मंजू हे मध्यवर्ती ठिकाण असून, गावाला पंचवीस ते तीस खेडी जोडली आहेत. बोरगावमंजू येथे पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालय आदी सुविधा असल्याने गावात परिसरातील नागरिकांची गर्दी असते. अकोल वाट झाल्यास नागरिकांना सोयीचे जाणार आहे. त्यामुळे अकोलवाट रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.