चोंढी-पिंपळडोळी रस्त्याची दुरवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:57 AM2021-01-08T04:57:21+5:302021-01-08T04:57:21+5:30
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले ...
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. चोंढी-पिंपळडोळी रस्त्याची चाळण झाल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पातूर तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या पांढुर्णा परिसरात रस्त्याची दुर्दशा झाली आहे.चोंढी-पिंपळडोळी रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मार्ग वाशिम व बुलडाणा जिल्ह्याला जोडणारा असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. खड्ड्यांमुळे या मार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे अनेकदा निवेदने देऊन मागणी केली आहे; मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याची स्थिती जैसे थे आहे. या मार्गाने शेतकऱ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच खड्ड्यांमुळे वाहनचालकांना पाठीच्या आजाराने ग्रासल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांकडून होत आहे. (फोटो)