कडोशी-कसुरा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:17 AM2021-01-21T04:17:49+5:302021-01-21T04:17:49+5:30
अनुदानित भुईमूग बियाणे उपलब्ध नाही! निहिदा : यंदा परिसरात भुईमुगाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. परिसरातील पिंजर येथील कृषी सेवा ...
अनुदानित भुईमूग बियाणे उपलब्ध नाही!
निहिदा : यंदा परिसरात भुईमुगाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. परिसरातील पिंजर येथील कृषी सेवा केंद्रात अनुदानित भुईमूग बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. याकडे लक्ष देऊन बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
---------------------------------
एसटी बस स्थानकात येतच नाही!
निहिदा : येथून जवळच असलेल्या पिंजर येथील एसटी बस सेवा पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला; मात्र एसटी बस स्थानकात येत नसून, बायपास परिसरातून निघून जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
---------------------------------
पिंपळगाव चांभारे- पिंपळगाव फाटा रस्त्याची दुरवस्था
बार्शिटाकळी : तालुक्यातील पिंपळगाव चांभारे-पिंपळगाव फाटा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या दोन कि.मी. अंतराच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.
----------------------------------------
मजुरांची टंचाई; शेतकरी संकटात
बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात तूर सोंगणीची लगबग सुरू आहे. सद्यस्थितीत तूर सोंगणी व कापूस वेचणीचे कामे एकाच वेळी आल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
---------------------------------
अकोट शहरात घाणीचे साम्राज्य
अकोट : शहरात नागरिक रस्त्यावरच कचरा फेकत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर कचरा तसाच पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
----------------------------------
सरपंच आरक्षण साेडतीची उत्सुकता; गावात रंगल्या चर्चा
बाळापूर : महाआघाडी सरकारने सरपंचपदाची थेट निवड रद्द केल्याने ग्रामपंचायत सदस्यांना पुन्हा महत्त्व आले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सरपंच साेडतीकडे लागले आहे. यासाठी ग्रामीण भागात चर्चा रंगल्या आहेत.
--------------------------------
तेल्हारा शहरातील बसस्थानकात कचऱ्याचे साम्राज्य
तेल्हारा : शहरातील बसस्थानकात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुुळे बसस्थानकात दुर्गंधी पसरली असून, प्रवाशांसह चालक-वाहकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे आगारप्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे.
-----------------------------------
तूर सोंगणीची लगबग
बाळापूर : तालुक्यातील देगाव, माणकी, कान्हेरी गवळी, खिरपुरी, टाकळी परिसरात तूर सोंगणीची लगबग सुरू आहे. यंदा तूर सोंगणीची मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
-----------------------------