मूर्तिजापूर-हिवरा कोरडे रस्त्याची दुरवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:14 AM2021-06-17T04:14:33+5:302021-06-17T04:14:33+5:30
भांबेरी येथे स्वच्छता अभियान भांबेरी : येथे सावित्रीच्या लेकी या ग्रामसंघामार्फत संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत, ...
भांबेरी येथे स्वच्छता अभियान
भांबेरी : येथे सावित्रीच्या लेकी या ग्रामसंघामार्फत संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत, मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्ष संगीता देशमुख, कोषाध्यक्ष वर्षा इंगळे, सुरेखा देशमुख, इंदु भोजने, उषा आगरकर, नलु राऊत, चंचल पुरी, भाग्यश्री बोदडे आदी महिला उपस्थित होत्या.
गावठाणच्या जागेतून वाळूचे उत्खनन
खेट्री : तुलंगा खुर्द गावाला लागून असलेल्या गावठाणच्या जागेतून गत महिनाभरापासून वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू आहे. वाळूचे उत्खनन करणाऱ्यांनी मोठमोठे खड्डे केल्यामुळे किरकोळ घटना घडल्या असून, मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे
निहिदा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, लॉकडाऊनसंदर्भात आदेश जारी केले आहेत, त्याचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन बार्शिटाकळीचे तहसीलदार गजानन हामंद यांनी नागरिकांना केले आहे.
‘पीक नुकसानीच्या अनुदानात वाढ करा!’
अडगाव : वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळते. परंतु वनविभागाकडून देण्यात येणारे अनुदान तुटपुंजे आहे. नुकसानभरपाई अनुदान वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.