विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमले रेल्वे स्थानक

By Admin | Published: July 4, 2014 12:27 AM2014-07-04T00:27:52+5:302014-07-04T00:45:25+5:30

शेकडो वारकरी पंढरपूरला रवाना

Badt railway station at the vault of Vitthal | विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमले रेल्वे स्थानक

विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमले रेल्वे स्थानक

googlenewsNext

अकोल : विठ्ठल दर्शनाची आस मनी धरून, विठ्ठल नामाचा जयघोष करणार्‍या वारकर्‍यांना घेऊन गुरुवारी अकोला रेल्वे स्थानकावरून विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस पंढरपूरकडे रवाना झाली. वारकर्‍यांच्या विठ्ठल नामाच्या जयघोषामुळे रेल्वे स्थानकाचा परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने दरवर्षी अमरावती ते पंढरपूरदरम्यान विशेष गाडी सोडण्यात येते. यंदादेखील रेल्वे प्रशासनाच्यावतीने विशेष गाडीची व्यवस्था करण्यात आली असून, तिच्या पहिल्या फेरीला गुरुवार ३ जुलै रोजी प्रारंभ झाला. अमरावती तथा अकोला रेल्वे स्थानकावरून बसलेल्या वारकर्‍यांचे स्वागत व सत्कार मोठय़ा उत्साहत अकोला रेल्वे स्थानकावर करण्यात आला.
विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस दुपारी ४.१५ च्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकावरील पहिल्या क्रमांकाच्या फलाटावर पोहोचली. याप्रसंगी उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड यांनी इंजीनची विधिवत पूजा करून इंजीन ड्रायव्हर आशीष श्रीवास्तव व अतुल लोणसने यांच्यासह स्टेशन प्रबंधक बी. पी. गुजर यांचा स्तकार केला. यावेळी त्यांच्यासोबत श्रीराम मोरवाल, विदर्भ वारकरी संघटनेचे मधुकर रुदानकर, वासुदेव बेंडे, सचिन पाटील, रवींद्र दुतोंडे, प्रल्हाद ढोरे, अशोक रुदानकर, बलिराम क्षीरसागर, गणेश चिंतामणे, सतीष वानखडे, वसंता अलोणे आदी उपस्थित होते. दरम्यान, फलटांवर खाद्य पदार्थांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांमार्फत वारकर्‍यांना अल्पोपाहार वितरित करण्यात आला.
गाडीला ५ सामान्य, १ शयन यान, १ वातानुकूलित आणि १ एसएलआर डबे राहणार आहेत. ही विशेष गाडी ३ जुलैव्यतिरिक्त ४, ६ व ७ जुलैलादेखील अमरावतीवरून पंढरपूरकडे रवाना होणार आहे. तसेच ५, ६, ११ व १२ ला पंढरपूरवरून अमरावतीकडे परतेल. पंढरपूरकडे जाणारी ही विशेष गाडी दुपारी ४.१५ वाजता तर पंढरपूरवरून अमरावतीकडे परतणारी गाडी सकाळी ८ वाजता अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. सामान्य यात्रेकरूंना १२0 रुपये, तर शयनयानसाठी ३६0 रुपये प्रवाशांना अदा करावे लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Badt railway station at the vault of Vitthal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.