अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून पाच लाखांचा गंडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:01 PM2017-10-22T22:01:06+5:302017-10-22T22:01:27+5:30
मूर्तिजापूर : जयस्तंभ चौकातील ढोकेश्वर मल्टी स्टेट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखा व्यवस्थापकाने अधिक व्याजदर व सोने सप्रेम भेट देण्याचे आमिष दाखवून ५ लाख २0 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार ताराचंद जानराव उजवणे यांनी १६ ऑक्टोबर रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

त्यांनी सदर तक्रारीत व्यवस्थापक श्वेता शिरीष घिणमिणे आणि शिरीष घिणमिणे यांनी शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव टाकून तुम्हाला सहकार्य करू, असे सांगून ५ लाख २0 हजार रुपये जमा करून त्यांना प्रमाणपत्रेसुद्धा दिली. सदर बंद केल्या गेलेल्या पतसंस्थेचे २७ डिसेंबर २0१६ रोजी रीतसर उद्घाटन केल्या गेले आणि अवघ्या नऊ महिन्यात १४ सप्टेंबर रोजी तांत्रिक कारण दाखवून कामकाज बंद करून शाखेस कुलूप ठोकले. तक्रारकर्ते ताराचंद जानराव उजवणे हे स्वत:च्या रकमेकरिता वणवण भटकत आहेत. त्यांना कुठेच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी शहर ठाण्यामध्ये तक्रार दिली. या प्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी अद्या पपर्यंत गुन्हा दाखल केला नाही.
मला तोंडी आदेश मिळाला म्हणून शाखा बंद केल्या गेली. जमाकर्त्यांची रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी जमा केलेली रक्कम इतर शाखेत वळविण्यात आली असल्यामुळे सध्या जमाकर्त्यांना रक्कम देणे शक्य नाही.
- श्वेता शिरीष घिणमिणे
शाखा व्यवस्थापक, मूर्तिजापूर