वाळूघाटांना लागेना बोली

By admin | Published: February 2, 2015 01:50 AM2015-02-02T01:50:26+5:302015-02-02T01:50:26+5:30

अकोला जिल्ह्यातील ११३ घाटांचा लिलाव बाकी; १६ कोटींचे उत्पन्न बुडणार?

Balaghatas do not have to lagna | वाळूघाटांना लागेना बोली

वाळूघाटांना लागेना बोली

Next

संतोष येलकर/अकोला:
जिल्ह्यातील १८८ वाळूघाटांच्या लिलावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शनिवारपर्यंत दोनदा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र केवळ ७५ घाटांचाच लिलाव झाला. लिलावात ह्यऑनलाइनह्ण बोली लागली नसल्याने, जिल्ह्यातील ११३ वाळूघाटांचा लिलाव अद्याप बाकी आहे. वाळूघाटांना ह्यबोली ह्णलागत नसल्याने, महसूल विभागाचे १६ कोटींचे उत्पन्न बुडण्याची शक्यता आहे.
गतवर्षी लिलाव करण्यात आलेल्या वाळूघाटांची मुदत गत सप्टेंबरअखेर सपुष्टात आली. राज्य पर्यावरण समिती, राज्य पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरण आणि विभागीय आयुक्त यांच्या परवानगीनंतर जिल्ह्यातील १८८ वाळूघाटांची ऑनलाइन लिलाव प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म विभागामार्फत सुरू करण्यात आली. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात राबविण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत जिल्ह्यातील ६८ वाळूघाटांचा लिलाव झाला. उर्वरित १२0 वाळूघाटांसाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन फेरलिलावा त शनिवार, ३१ जानेवारी रोजी केवळ सात वाळूघाटांचा लिलाव झाला. जिल्ह्यातील एकूण १८८ वाळूघाटांच्या लिलावातून २१ कोटी १७ लाख ४५ हजार १४७ रुपयांचे उत्पन्न जिल्हाधिकारी कार्यालयाला अपेक्षित आहे. तथापि, आतापर्यंत दोनदा राबविण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत निर्धारित रक्कम प्राप्त होऊ शकली नाही. पहिल्यांदा ६८ वाळूघाटांच्या लिलावातून ४ कोटी १७ लाख ७१ हजार १२९ रुपये आणि दुसर्‍यांदा सात वाळूघाटांच्या लिलावातून ६१ लाख ९२ हजार रुपयांचा महसूल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. अशाप्रकारे आतापर्यंत दोनदा झालेल्या लिलावातून केवळ ४ कोटी ७९ लाख ६३ हजार १२९ रुपयांचेच उत्पन्न मिळाले आहे. उर्वरित ११३ वाळूघाटांचा लिलाव बाकी आहे. त्यामधून १६ कोटी ३७ लाख ८२ हजार १८ रुपयांचे उत्पन्न मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील वाळूघाटांसाठी लिलावात ऑनलाइन बोली प्राप्त होत नसल्याने, त्यापासून मिळणार्‍या अपेक्षित उत्पन्नापैकी महसूल विभागाचे १६ कोटींचे उत्पन्न बुडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Balaghatas do not have to lagna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.