बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेने मुदत ठेवीची रक्कम व्याजासह द्यावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:50 AM2017-12-20T01:50:51+5:302017-12-20T01:51:07+5:30
अकोला : बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेने बाळापुरातील गुंतवणूकदार केतन वसंतराव पडधरिया यांची मुदत ठेवीची परिपक्व झालेली ४ लाख २४ हजार ७८0 एवढी रक्कम व्याजासह परत द्यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच अध्यक्ष एस. एम. उंटवाले, सदस्य भारती केतकर, डब्ल्यू. व्ही. चौधरी यांनी दिला आहे. सदर आदेशामुळे या पतसंस्थेत गुंतवणूक केलेल्या शेकडो ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेने बाळापुरातील गुंतवणूकदार केतन वसंतराव पडधरिया यांची मुदत ठेवीची परिपक्व झालेली ४ लाख २४ हजार ७८0 एवढी रक्कम व्याजासह परत द्यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच अध्यक्ष एस. एम. उंटवाले, सदस्य भारती केतकर, डब्ल्यू. व्ही. चौधरी यांनी दिला आहे. सदर आदेशामुळे या पतसंस्थेत गुंतवणूक केलेल्या शेकडो ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
तक्रारकर्ता वसंतराव पडधारिया यांनी २३ डिसेंबर १४ रोजी एक लाख रुपये १३ महिन्यांसाठी १२ टक्के व्याजाने मुदत ठेवीत पतसंस्थेत ठेवले. ही ठेव २३ जानेवारी रोजी परिपक्व झाली. दरम्यान, पतसंस्थेने २३ मे १६ रोजी मुदत वाढवून दिली. २२ मार्च रोजी १४ हजार व्याज दिले व मुदतपूर्वीवर १ लाख ४ हजार देणार होते. त्यानंतर ११ मे २0१५ रोजी, ७ हजार सुरुवातीला १३ महिन्यांकरिता १३ टक्के व्याजावर ठेवले. सदर रक्कम ११ जून २0१६ रोजी परिपक्व झाली व मुदतपूर्वीवर रुपये ७९८५ देणार होते. तसेच १३ मे १३ रोजी १ लाख २0 हजार सुरुवातीला १३ महिन्यांकरिता १३ टक्के व्याजावर ठेवले होते. त्यानंतर वेळोवेळी ही रक्कम रिनीवल केली. १३ ऑगस्ट २0१६ रोजी रक्कम परिपक्व होऊन १,७८,१७५ एवढी झाली. तिन्ही मुदत ठेवीची मुदतपूर्ती झाल्यानंतर तक्रारकर्त्याने वारंवार मागणी केली. याव्यतिरिक्त तक्रारकर्त्याने १३ ऑगस्ट १५ रोजी ७२ हजार, ७ ऑगस्ट १५ रोजी ९ हजार, २७ ऑगस्ट १५ रोजी ६ हजार, १७ ऑक्टोबर १५ रोजी ११ हजार, ३ नोव्हेंबर १५ रोजी १५ हजार आणि २२ डिसेंबर १५ रोजी ५ हजार अशी रक्कम पतसंस्थेकडेच जमा केली. ती परिपक्व रक्कम ४ लाख २४ हजार ७८0 एवढी झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनही पतसंस्थेने रक्कम परत केली नाही. तक्रारकर्त्याने रक्कम मिळविण्यासाठी नोटीस पाठविली; मात्र काहीएक परिणाम झाला नाही. त्यामुळे आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईसाठी ३0 मार्च १७ रोजी ग्राहक मंच येथे धाव घेतली. परिपक्व झालेल्या ४ लाख २४ हजार ७८0 रुपयांवर ३0 मार्चपासून नऊ टक्के व्याज, नुकसानभरपाई म्हणून पाच हजार आणि न्यायिक खर्चापोटी तीन हजार रुपये देण्याचे आदेशही ग्राहक मंचाने दिले आहे.
‘प्रत्येकाची रक्कम परत मिळेल..’
गुंतवणूक केलेल्या प्रत्येकाची रक्कम देण्यास पतसंस्था कटिबद्ध आहे. थकीतदारांकडे मोठी रक्कम थांबल्याने संस्था अडचणीत आहे. थकीतदारांच्या वसुलीतून संस्था अडचणीतून लवकरच बाहेर पडेल. पडधरियाप्रकरणी संस्थेने अपील दाखल केलेले आहे, अशी माहिती बाळापूर नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष, काँग्रेसचे माजी आमदार अँड.नातिकोद्दीन खतीब यांच्यावतीने श्याम शेगोकार यांनी दिली.