बाळापूर : कत्तलीसाठी जाणार्‍या चार गुरांना पोलिसांनी दिले जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 09:47 PM2018-01-25T21:47:12+5:302018-01-25T21:48:39+5:30

बाळापूर :  बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील गुरांच्या बाजारातून खरेदी केलेल्या चार गुरांची मालवाहू वाहनातून वाहतूक करीत आणून बाळापूर  शहरातील  म्हैस  नदीजवळ उतरविण्यात येत  असताना  बाळापूर  पोलिसांनी  चारही गुरे व मालवाहू  वाहन जप्त  करुन वाहनचालकाला अटक  केल्याची घटना २५ जानेवारीला दुपारी २ वाजता घडली.

BALAPUR: Police gave four lives to the killings! | बाळापूर : कत्तलीसाठी जाणार्‍या चार गुरांना पोलिसांनी दिले जीवदान!

बाळापूर : कत्तलीसाठी जाणार्‍या चार गुरांना पोलिसांनी दिले जीवदान!

Next
ठळक मुद्देबाळापुरात गुरासह वाहन जप्त वाहनचालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर :  बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील गुरांच्या बाजारातून खरेदी केलेल्या चार गुरांची मालवाहू वाहनातून वाहतूक करीत आणून बाळापूर  शहरातील  म्हैस  नदीजवळ उतरविण्यात येत  असताना  बाळापूर  पोलिसांनी  चारही गुरे व मालवाहू  वाहन जप्त  करुन वाहनचालकाला अटक  केल्याची घटना २५ जानेवारीला दुपारी २ वाजता घडली.
खामगाव शहरातील गुरांच्या बाजारातून गुरे खरेदी करून ती मालवाहू वाहनातून बाळापूर  शहरात  आणून त्या गुरांची सध्या अवैध कत्तल केली  जात आहे. गोहत्याबंदी  कायदा लागू असताना बाळापुरात दररोज  शेकडो  गुरांची कत्तल करुन  त्याची विक्री  दुकान  लावून केली जात आहे. अशाच प्रकारे २५ जानेवारी रोजी खामगावच्या बाजारातून चार गुरांची खरेदी करून त्यांना मालवाहू वाहनातून बाळापूर येथे आणण्यात आले. त्या चारही गुरांना येथील म्हैस नदीजवळ वाहनातून दुपारी २ वाजता उतरविण्यात येत असताना बाळापूर  पोलीस  स्टेशनचे पोलीस  उपनिरीक्षक  विठ्ठल  वाणी यांनी ८0 हजार रुपये किंमतीचे एम.एच. ३0 एबी ८३९ क्रमांकाचे मालवाहू वाहन व २६ हजार रुपये किंमतीची चार गुरे असा एकुण एक लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सदर वाहनाचा  चालक साहेब खाँ युसुफखाँ (३0)  रा. पारस याला अटक  करून  त्याच्याविरुध्द पोलिस  उपनिरीक्षक  विठ्ठल  वाणी यांच्या फिर्यादीवरून  कलम ५,५(अ),५(ब) प्राणी  संरक्षण  कायदा १९७६चे कलम ११(ड),(ल), प्राण्यांना निर्दयपुर्वक वागणूक प्रतिबंधक कायदा १९६0च्या कलमानुसार  कारवाई केली आहे.

Web Title: BALAPUR: Police gave four lives to the killings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.