बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर गुरांचे तीन क्विंटल मांस जप्त; तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 08:48 PM2018-01-29T20:48:39+5:302018-01-29T20:56:50+5:30
बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहू वाहनातून नेत असलेले गुरांचे तीन क्विंटल मांस व मालवाहू वाहन बाळापूर पोलिसांनी २९ जानेवारी रोजी जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहू वाहनातून गुरांचे मांस नेण्यात येत असल्याची माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मालवाहू वाहन क्र. एम.एच.२७ एक्स ८0९१ ला अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये कुटाराच्या पोत्याखाली गुरांचे मांस आढळले. पोलिसांनी ४0 हजार रुपये किंमतीचे तीन क्विंटल मांस व ३ लाख ६0 हजार रुपये किंमतीचे वाहन असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी अमरावती येथील रहिवासी गाडीचालक इलीयासअली महेबुब अली, शे.इरफान शे.जिलानी, जमीर अहेमद अ. रशीद या तीन आरोपींना अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद वाघमोडे यांच्या पथकाने केली. तिन्ही आरोपींविरुद्ध कलम ५ ब, ५ क, ८, ९ (अ) प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद वाघमोडे करीत आहेत.