बालकुमार साहित्य संमेलन हा सिमोलंघन करण्याचा सफल प्रयत्न ! - डॉ. श्रीकांत तिडके
By Atul.jaiswal | Published: December 2, 2017 06:37 PM2017-12-02T18:37:45+5:302017-12-02T18:41:14+5:30
अकोला : पाचवे बालकुमार साहित्य संमेलन हे केवळ साहित्यापुरते मयार्दीत राहीले नसून, नृत्य, संगीत, लोककलांना सामावून घेत एक सिमोल्घंन करण्याचा सफल प्रयत्न आहे. या माध्यमातून एक नवा परिपाठ घालून घेतला असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांनी व्यक्त केले. पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकर कठहाडे, विदर्भ साहित्य संघ, नागपूर तसेच अकोला शाखेचे पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आजच्या काळात टॅलंट सर्च करण्याची खरी गरज आहे. या संमेलनाने बालकांना व्यासपीठ' दिले आहे. साहित्यातून वास्तवाची ओळख होत असल्याचे डॉ. तिडके म्हणाले.
पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकर कºहाडे यांनी त्यांच्या समारोपीय भाषणात या संमेलनाने लिहिन्याची नवउर्मी दिली असल्याचे सांगीतले. साहित्यनिर्मितीतून बाहेर वंचितांच्या व्यथा व कथा लेखनीतून मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संपुर्ण साहित्य संमेलनाचा बोलका आढावा सीमा शेटे रोठे यांनी घेतला. या साहित्य संमेलन नवीन पायंदे पाडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रायोजक, आणि प्रसिद्धीमाध्यमाच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. साक्षी माहोरे व वेंदांत मुंडे यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन केले. संमेलनासाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिके वितरीत करण्यात आले. संमेलनाच्या आयोजनाबाबत अमरावती येथील प्रा.डॉ.हेमंत खडके यांनी पालकांचे प्रतिनिधी म्हणून आयोजनाबाबत प्रतिक्रिया देताना दालनांची कल्पकता भाषा गौरव दिंडी, वाघांची गुहा, जागर मराठी कवितांचा आदि बाबींचे भरभरुन कौतुक केले. या कार्यक्रमाप्रसंगी नागपूर वि.सा.संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे संमेलन आमंत्रक शुभदा फडणवीस यांनी संमेलनाच्या मुख्य आयोजकांचे व अकोला शाखेच्या सर्व पदाधिकाºयांचे कौतुक केले.