बल्लाडीच्या सपनाची उंच भरारी; राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:19 AM2021-09-25T04:19:14+5:302021-09-25T04:19:14+5:30

वाडेगाव : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्य ...

Balladi's dream soared; Awarded the National Service Plan Award by the President | बल्लाडीच्या सपनाची उंच भरारी; राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित

बल्लाडीच्या सपनाची उंच भरारी; राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित

Next

वाडेगाव : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार २०१९-२०’चे वितरण करण्यात आले. यामध्ये अकोला येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी सपना बाबर यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राज्यातून मनोज गुंजाळ आणि सपना बाबर या दोन विद्यार्थ्यांना सन्मानित केले आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तर सुषमा स्वराज भवनातून युवक कल्याण व क्रीडामंत्री अनुरागसिंह ठाकूर, राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, युवक कल्याण विभागाच्या सचिव उषा शर्मा आणि क्रीडा विभागाचे सचिव रवि मित्तल उपस्थित होते.

देशाच्या विविध भागातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी तीन श्रेणींमध्ये गौरविण्यात आले. यावेळी एकूण ४२ पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे येथील मनोज गुंजाळ आणि अकोला येथील विद्यार्थिनी सपना बाबर यांनाही यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकांच्या श्रेणीत गौरविण्यात आले.

मनोज गुंजाळ यांनी जलसंरक्षण, हरितगाव, अवयवदान, प्रौढ साक्षरता, उज्ज्वला योजना, रक्तदान, वृक्षारोपण आदी कार्यक्रम व उपक्रमात सक्रिय सहभाग घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आपत्ती व्यवस्थापन विषयक हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनातही मनोज मुंजाळ यांनी महत्त्वाचा सहभाग दिला होता.

-------

सपनाचे तंबाखूमुक्त अभियानात उल्लेखनीय कार्य

सपना बाबर यांनी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, तंबाखूमुक्त अभियान आणि रस्ता सुरक्षा जागरूकता या कार्यक्रमांमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. झोपडपट्टीतील जनतेला विविध जनोपयोगी उपक्रमात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच एड्स जागरूकता रॅलीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

-------------

बल्लाडीच्या शिरपेचात मानाचा तूर

वाडेगावपासून अवघ्या ७ किमी अंतरावर असलेल्या ग्राम बल्हाडी येथील सपना सुरेश बाबर हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळविल्याने गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकविले आहे. राज्याच्याच नव्हे, जिल्हा, तालुका तथा बल्लाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. २०० लोकसंख्या असलेल्या बल्लाडीच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रोजेक्टरवर पुरस्कारचा लाइव्ह कार्यक्रम बघितला. सपनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Balladi's dream soared; Awarded the National Service Plan Award by the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.