विकास कामांची बाेंब; नगरसेवकांना निवडणुकीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:23 AM2021-08-20T04:23:58+5:302021-08-20T04:23:58+5:30

महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजना, अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार याेजना तसेच दलितेतर ...

Bamb of development works; Election concern to corporators | विकास कामांची बाेंब; नगरसेवकांना निवडणुकीची चिंता

विकास कामांची बाेंब; नगरसेवकांना निवडणुकीची चिंता

Next

महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजना, अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार याेजना तसेच दलितेतर याेजनेंतर्गत किमान २० काेटी रुपये निधी प्राप्त हाेताे. या निधीतून प्रभागातील रस्ते, नाल्या, पेव्हर ब्लाॅक, धापे, खुल्या जागांचे साैंदर्यीकरण आदी विकास कामे करण्यासाठी नगरसेवकांकडून प्रस्ताव मागितले जातात. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी शासनाने नगराेत्थान अंतर्गत साडेसात काेटींचा निधी मंजूर केला. यातून ३० टक्के निधी काेविडसाठी राखीव ठेवल्याने उर्वरित ५ काेटी २५ लाख रुपयांत मनपाला ३० टक्क्यांनुसार १ काेटी ७५ लाख रुपये हिस्सा जमा करणे भाग आहे. अर्थात एकूण ६ काेटी ८२ लाख ५० हजार रुपयांतून प्रस्ताव तयार करणे अपेक्षित आहे. दुसरीकडे दलितेतर वस्तीसाठी साडेसात काेटी प्राप्त झाले. यातही काेविडसाठी ३० टक्के निधी राखीव ठेवण्यात आल्याने उर्वरित ५ काेटी २५ लाखांच्या निधीतून प्रशासनाने नगरसेवकांमार्फत प्रस्ताव बाेलावले. चार महिन्यांनंतर मनपाची सार्वत्रिक निवडणूक पाहता १२ काेटींची कामे तातडीने सुरू हाेणे गरजेचे हाेते. ही कामे अद्यापही रखडल्याचे चित्र आहे.

आमदार निधीतील रस्त्यांची वाट

माेठा गाजावाजा करीत स्थानिक लाेकप्रतिनिधींना प्राप्त निधीतून शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आली. यातील काही प्रमुख रस्त्यांची अवघ्या सहा महिन्यांतच वाट लागल्याचे दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने सिटी काेतवाली ते थेट छत्रपती शिवाजी महाविद्यालय रस्ता, नेहरू पार्क ते सिव्हिल लाइन चाैकापर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे.

निविदा कधी प्रसिद्ध करणार?

नगरसेवकांमार्फत विकास कामांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून समाज कल्याण विभागाने प्रस्तावांची छाननी केल्याचा दावा बांधकाम विभागाकडून केला जाताे. असे असेल तर १२ काेटींच्या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्याला विलंब का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Web Title: Bamb of development works; Election concern to corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.