अकोला जिल्ह्यात चाराटंचाई; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:29 PM2018-04-24T13:29:00+5:302018-04-24T13:29:00+5:30
अकोला: चारा टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील पशुधनासाठी उपलब्ध चारा सुरक्षित राहावा, या दृष्टीने जिल्ह्यातील चाºयाची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २० एप्रिल रोजी दिला.
अकोला: चारा टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील पशुधनासाठी उपलब्ध चारा सुरक्षित राहावा, या दृष्टीने जिल्ह्यातील चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २० एप्रिल रोजी दिला.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अकोला जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने, पिकांचे उत्पादनही कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून, जनावरांसाठी पाणी व चारा टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसात चारा टंचाईचा प्रश्न तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील उपलब्ध चारा सुरक्षित राहावा, या दृष्टीने जिल्ह्यातील चाºयाची जिल्ह्याबाहेर लगतच्या जिल्ह्यात वाहतूक करण्यावर निर्बंध घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला आहे. हा आदेश ३१ जुलैपर्यंत लागू राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्याबाहेरील जनावरांच्या वाहतुकीवरही निर्बंध!
जिल्ह्यातील उपलब्ध चारा सुरक्षित राहावा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पशुसंवर्धन विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय जिल्ह्याबाहेरील जनावरांची जिल्ह्यात वाहतूक होऊ नये, असेही जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरील जनावरांच्या वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.