जेनेरिकच्या ८० औषधांवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 01:39 PM2019-01-23T13:39:54+5:302019-01-23T13:40:13+5:30

अकोला - रुग्णांना स्वस्त औषध सेवा देणाऱ्या जेनेरिक औषधांमधील ८० औषधांचे प्रयोग धोकादायक असल्याच्या कारणावरुन हे औषध केंद्रीय आरोग्य विभागाच्या समितीने दिलेल्या अहवालानंतर बंद करण्यात आले आहेत.

 Ban on Generic 80 Drugs | जेनेरिकच्या ८० औषधांवर बंदी

जेनेरिकच्या ८० औषधांवर बंदी

googlenewsNext

- सचिन राऊत

अकोला - रुग्णांना स्वस्त औषध सेवा देणाऱ्या जेनेरिक औषधांमधील ८० औषधांचे प्रयोग धोकादायक असल्याच्या कारणावरुन हे औषध केंद्रीय आरोग्य विभागाच्या समितीने दिलेल्या अहवालानंतर बंद करण्यात आले आहेत. चार ते पाच ड्रग एकत्रित करून निर्मिती करण्यात आलेल्या या कॉम्बिनेशन औषधांचा वापर घातक असल्याने जेनेरिकच्या ८० औषधांची निर्मिती आणि विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
सर्दी, ताप, पोटदुखी, उलटी, सांधेदुखी या आजारावर जेनेरिक औषधं उपलब्ध असून, या औषधांचा प्रयोग करणे सुरक्षित नसल्याचे कें द्रीय आरोग्य विभागाच्या समितीमध्ये समोर आल्यानंतर या ८० जेनेरिक औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. फिक्स डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) असणाºया औषधांमध्ये अधिक प्रमाणात एॅन्टीबायोटीक औषधांचा समावेश असल्याने आणि यामधील काही औषधं शरीरासाठी धोकादायक असल्याने या औषधांवर बंदी लादण्यात आली आहे. एफडीसी अंतर्गत असलेल्या ३०० पेक्षा अधिक औषधांवर प्रतिबंध घालण्यात आले असून, त्यानंतर आता जेनेरिकच्या ८० औषधांवर प्रतिबंध घालण्यात आले आहे. यामध्ये सर्दी, ताप, पोटदुखी, सांधेदुखी व उलटी यासारख्या औषधांचा समावेश आहे. स्वस्तात मिळत असलेली ही औषधे रुग्णांसाठी धोकादायक असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांनीही या औषधांची तपासणी सुुरू केली आहे. जेनेरिक मेडिकल स्टोअर्समधूनच ही औषधे मोठया प्रमाणात विक्री करण्यात येत असल्याचे वास्तव आहे. जेनेरिक औषधांचा वार्षिक व्यवसाय हा तब्बल ९०० कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे. या व्यावसायावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
काय आहे फिक्स डोस कॉम्बिनेशन
फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांमध्ये चार ते पाच घटक असलेले ड्रग अ‍ॅन्टीबायोटीक म्हणून वापरण्यात येतात. विविध घटक एकत्रित करून सर्दी, ताप, पोटदुखीसह काही आजारांवर वापरण्यात येत असलेल्या औषधांमध्ये प्रमाणाचा अतिरेक होत असल्याने ते शरीरासाठी घातक ठरतात. त्यामुळे फिक्स डोस कॉम्बिनेशनच्या या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.


 
जेनेरिक किंवा इतर कंपन्यांच्या कॉम्बिनेशन औषधांमध्ये काही धोकादायक घटक असल्याचे समोर आले आहे. या आधीदेखील औषधांवर बंदी होती; मात्र न्यायालयात प्रकरण प्रलंबित होते; मात्र आता न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने बंदी घातली आहे.
- ह. य. मेतकर
सहायक आयुक्त, औषध प्रशासन विभाग.
 

 

Web Title:  Ban on Generic 80 Drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.