सराफांच्या बंदची कोंडी फुटणार!
By admin | Published: April 12, 2016 01:52 AM2016-04-12T01:52:17+5:302016-04-12T01:52:17+5:30
सराफांना दिलासा; लवकरच निर्णयाची शक्यता.
अकोला: गुढीपाडव्याचा मुहूर्त ह्यकॅशह्ण केल्यानंतर आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवायची की बंद, या द्विधा मन:स्थितीत असलेल्या सराफांना लवकरच दिलासा देणारा निर्णय सरकार जाहीर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अखिल भारतीय सराफ कृती समितीसोबत गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली येथे सुरू असलेल्या चर्चेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने सकारात्मक भूमिका दर्शविली असून, लवकरच सराफांना दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कृती समितीमध्ये अकोल्याचे वसंत खंडेलवाल यांचा समावेश आहे. शनिवारी कृती समितीसोबत पार पडलेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी एक्साइज ड्युटीचा निर्णय कायम ठेवत, अडचणीच्या आणि जाचक वाटणार्या अटींसंदर्भान नवीन प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. सरकार सकारात्मक विचार करीत असून, लवकरच सराफा व्यावसायिकांना दिलासा देणारा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.