वांझोटी केळी रोपे प्रकरण विधीमंडळात गाजणार

By admin | Published: February 27, 2016 01:37 AM2016-02-27T01:37:42+5:302016-02-27T01:37:42+5:30

विरोधीपक्ष नेत्याकडून दखल.

Banjali banana seedlings will be litigated in the legislature | वांझोटी केळी रोपे प्रकरण विधीमंडळात गाजणार

वांझोटी केळी रोपे प्रकरण विधीमंडळात गाजणार

Next

आकोट (अकोला): केळीची वांझोटी रोपे देऊन शेतकर्‍यांची फसवणूक केलेले प्रकरण राज्य विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात गाजणार आहे. याप्रकरणाची दखल थेट विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. आकोट तालुक्यातील आंबोडा येथील शेतकर्‍यांनी जून ते जुलै २0१५ दरम्यान केळी पिकाची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी रमेश रामचंद्र आकोटकर यांच्यासह दोघांच्या गणराज केला ग्रुप या दुकानातून केळीची रोपं विकत घेतली होती. त्यांनी इंद्रायणी जातीचे बियाणे मिळण्यासाठी आगाऊ बुकिंग केले होते; मात्र इंद्रायणी जातीचे बुकिंग केल्याची पावती असताना शेतकर्‍यांना दुसर्‍याच कंपनीची रोपे पुरविण्यात आली होती. याबाबत शेतकर्‍यांनी कृषी विभाग व पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. मात्र, पोलिसांनी कृषी विभागाला प्रत्येक शेतकर्‍यांचे वैयक्तिक नुकसान किती झाले, याबाबतचा अहवाल मागितला होता. दरम्यान, कृषी विभागाने आठ शेतकर्‍यांचे उत्पन्न बुडाल्याचा अहवाल ग्रामीण पोलीस स्टेशनला सादर केला होता. आठ शेतकर्‍यांचे ६0 लाख ६३ हजार २११ रुपयांचे उत्पन्न बुडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. शेतकर्‍यांची फसवणुक झाल्याचे कृ षिविभागाने सकृ त दर्शनी अहवालात मान्य केले आहे. या प्रकरणाचा 'लोकमत' प्रभावी पाठपुरावा करीत आहे. लोकमतमध्ये या प्रकरणाशी निगडीत बातम्यांची कात्रणे, शेतकर्‍यांची तक्रार व कृषि विभागाच्या अहवालाची प्रत राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचेचे आकोट शहर अध्यक्ष रोशन पर्वतकर यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे पाठविली. या माहितीची दखल मुंडे यांनी घेतली आहे.

Web Title: Banjali banana seedlings will be litigated in the legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.