बंजारा समाजाने तीज उत्सवातून घडविले लोकसंगिताचे दर्शन!

By admin | Published: September 5, 2016 05:38 PM2016-09-05T17:38:49+5:302016-09-05T17:38:49+5:30

तिजोत्सवातून बंजारा समाज बांधवांनी मालेगाव तालुक्यातील वरदरी येथे तिजोत्सवाच्या समारोप दिनी ५ सप्टेंबरला काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून पारंपारिक वेशभूषा, नृत्य व लोकसंगितांचे दर्शन घडविले.

Banjara society celebrated festive gathering from Tea Festival! | बंजारा समाजाने तीज उत्सवातून घडविले लोकसंगिताचे दर्शन!

बंजारा समाजाने तीज उत्सवातून घडविले लोकसंगिताचे दर्शन!

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ५ -  बंजारा समाजातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा सण म्हणजे तिजोत्सव. या तिजोत्सवातून बंजारा समाज बांधवांनी मालेगाव तालुक्यातील वरदरी येथे तिजोत्सवाच्या समारोप दिनी ५ सप्टेंबरला काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून पारंपारिक वेशभूषा, नृत्य व लोकसंगितांचे दर्शन घडविले. यामध्ये विशेष म्हणजे डफडयावर थाप मारणारी सुध्दा महिलाचं होती.
 
तीज उत्सव साजरा करतांना नाईक व कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा केला जातो. वरदरी येथील तिज उत्सवाचे नाईक म्हणून सुभाष मोतीराम चव्हाण तर कारभारी रामसिंग जेमला राठोड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला.  यावेळी शेकडो बंजारा समाजातील महिला व पुरुषांचा यामध्ये सहभाग होता. बंजारा समाजातील पारंपारिक गिते व नृत्यांवर पारंपारिक वेशभूषेत असलेल्या बंजारा समाजातील महिलांनी दर्शन घडविले.

Web Title: Banjara society celebrated festive gathering from Tea Festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.