दीडशे रुपयांसाठी काढावे लागते हजार रुपयांचे बँक खाते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:14 AM2021-07-08T04:14:04+5:302021-07-08T04:14:04+5:30

शालेय विद्यार्थ्यांना दरदिवशी पोषण आहार वाटप केला जातो. मात्र, कोरोनामुळे यंदा शाळा भरल्या नाहीत. त्यामुळे आहार न शिजवता धान्य ...

A bank account of one thousand rupees has to be taken out for one and a half hundred rupees! | दीडशे रुपयांसाठी काढावे लागते हजार रुपयांचे बँक खाते !

दीडशे रुपयांसाठी काढावे लागते हजार रुपयांचे बँक खाते !

Next

शालेय विद्यार्थ्यांना दरदिवशी पोषण आहार वाटप केला जातो. मात्र, कोरोनामुळे यंदा शाळा भरल्या नाहीत. त्यामुळे आहार न शिजवता धान्य वाटप करण्यात आले. आता तर धान्यही न देता पोषण आहाराचे पैसेच थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात टाकण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. उन्हाळ्यात शाळांना सुटी असली, तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक आहे. यंदा शाळा बंद असल्याने काही काळ आहार ऐवजी धान्य वाटप करण्यात आले. मात्र, उन्हाळ्यात धान्य वाटपही शक्‍य झाले नाही. त्यामुळे आता या आहाराचे थेट पैसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टाकले जाणार आहेत. त्यासाठी मुलांचे बँक खाते काढण्याकरिता एक हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

बँकेत खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये

प्रतिविद्यार्थी दरमहा दीडशे ते अडीचशे रुपयांपर्यंत उन्हाळी सुटीतील आहाराचे पैसे मिळणार आहेत.

मात्र यंदा शाळा ऑनलाईन भरणार असल्यामुळे २०२१-२०२२ या शैक्षणिक सत्रातील आहार ऐवजी धान्य मिळणार की डीबीटीद्वारे पैसेच मिळणार, याबाबत संभ्रम कायम आहे.

पोषण आहारासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची अद्ययावत माहिती तयार ठेवण्याचे नियोजन सुरू आहे.

ज्यांचे बँक खाते अद्याप उघडले गेले नाही, अशा विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी शाळांनी सहकार्य करावे, असे आदेश आहेत.

पालकांची डोकेदुखी वाढली

दीडशे रूपयांच्या अनुदानासाठी विद्यार्थ्यांचे बॅंक खाते काढणे डोकेदुखी ठरत आहे. त्यात बॅंकेत गर्दी असल्याने, लवकर खाते निघत नाही. त्यासाठी सातत्याने बॅंकेच्या चकरा माराव्या लागत आहेत.

-प्रशांत येसनसुरे, पालक

केवळ १५० रूपयांसाठी हजार रूपयांचे खाते काढावे लागत आहे. त्यातही बॅंकेत चकरा माराव्या लागत आहे. त्यापेक्षा १५० रूपयांचे अनुदानही आम्हाला नको आणि त्रासही नको. १५० रूपयांसाठी हजार रूपये द्यावे लागत आहे. त्यातही तुटपुंजे अनुदान मिळत आहे.

-प्रेमलता वासनिक, पालक

उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता ते अनुदान बँक खात्यात जमा करण्याचा शासनाचा निर्णय पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आता विद्यार्थ्यांचे बँक खाते काढावे लागत आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उन्हाळी सुटीच्या कालावधीतील लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे.

-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

२३४ रुपये

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार

१५६ रुपये

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार

जिल्ह्यातील पात्र लाभार्थी

पहिली ते आठवी विद्यार्थी

पहिली २९,४१८

दुसरी २९,२४८

तिसरी २९,७८०

चौथी ३०,१८५

पाचवी २९,६५७

सहावी २९,२८९

सातवी २८,८४७

आठवी २८,७९७

Web Title: A bank account of one thousand rupees has to be taken out for one and a half hundred rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.