बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:31 PM2018-05-31T15:31:07+5:302018-05-31T15:31:07+5:30
अकोला : वेतनवाढीच्या प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघटनांच्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने दोन दिवसीय बंद पुकारला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील आर्थिक व्यवहार ठप्प पडल्याचे चित्र दिसून आले.

बुधवारी अकोला शहरातील गांधी मार्गावरील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर सकाळी साडेदहा वाजता सर्व युनायटेड फोरमच्या सदस्यांनी फोरमचे अकोला जिल्हाध्यक्ष श्याम माईणकर, प्रकाश दाते, दिलीप पिटके, गजानन पवार आदी पदाधिकाºयांच्या नेतृत्वात निदर्शने केली.
बँक कर्मचाºयांच्या ११ व्या द्विपक्षीय कराराची मुदत नोव्हेंबर १७ मध्ये संपुष्टात आली. इंडियन बँक असोसिएशन व युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. इंडियन बँक असोसिएशनकडून दोन टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव आला. त्याला विरोध म्हणून देशभरात संप पुकारला गेला आहे.भारतभरातून सुमारे दहा लाख कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. अकोल्यातील आंदोलनात सुधीर देशपांडे, उमेश शेळके, सुनील दुर्गे, दिलीप देशमुख, दीपक नीळ, ठोंबरे, प्रकाश देशपांडे, प्रवीण महाजन, अनिल मावळे यांच्यासह तीनशे कर्मचारी प्रामुख्याने सहभागी झाले होते.