बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:21 AM2021-02-24T04:21:01+5:302021-02-24T04:21:01+5:30

बँक ऑफ महाराष्ट्रच्या अकराशेपेक्षा जास्त शाखेत कायमस्वरूपी सफाई कर्मचारी नाहीत, तसेच ६०० पेक्षा जास्त शाखेमध्ये कायमस्वरूपी शिपाई नेमले नाहीत. ...

Bank of Maharashtra employees protest! | बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने!

बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने!

Next

बँक ऑफ महाराष्ट्रच्या अकराशेपेक्षा जास्त शाखेत कायमस्वरूपी सफाई कर्मचारी नाहीत, तसेच ६०० पेक्षा जास्त शाखेमध्ये कायमस्वरूपी शिपाई नेमले नाहीत. बँकेने मागील पाच वर्षांपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती यामुळे रिक्त झालेल्या क्लार्क पदाची भरती केली नाही. त्यानुसार एक हजारापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. याशिवाय नवीन शाखा उघडल्या, व्यवसायात वाढ झाल्याने बँकेवरील ताण वाढला आहे. पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी आऊटसोर्सद्वारे कामे केली जात आहेत. ज्यामुळे बँकेत आर्थिक घोटाळे होण्याच्या शक्यता निर्माण होत असल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, बँक अनेक वर्षांपासून चालू असलेल्या प्रथेला सोडचिठ्ठी देऊन कर्मचाऱ्यांशी निगडित निर्णय युनियनला विश्वासात न घेता एकतर्फी घेत आहे. ज्यावर युनियनने तीव्र आक्षेप घेतला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात संघटनेतर्फे २६ फेब्रुवारी रोजी बँकेच्या देशभरातील ३७ झोनल ऑफिससमोर धरणे, तर ६ मार्च रोजी पुणे येथील केंद्रीय कार्यालय लोकमंगल येथे धरणे देणार आहेत. तसेच १२ मार्च रोजी देशव्यापी संप करण्यात येणार असल्याची माहिती ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे देण्यात आली. धरणे आंदोलनात फेडरेशनचे प्रवीण महाजन, श्याम माईनकर, अनिल मावळे, प्रदीप देशपांडे, अनिल बेलोकार, शुभांगी मानकर, शिल्पा ढोले, बाळासाहेब बोचे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Bank of Maharashtra employees protest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.