जिल्हाधिकारी कार्यालयात नोटांच्या शंका निरसनासाठी बँक प्रतिनिधी!

By admin | Published: November 18, 2016 02:11 AM2016-11-18T02:11:34+5:302016-11-18T02:11:34+5:30

अकोला जिल्हाधिका-यांचे ‘एलडीएम’ला पत्र

Bank representative for the removal of the notice of the collector's office! | जिल्हाधिकारी कार्यालयात नोटांच्या शंका निरसनासाठी बँक प्रतिनिधी!

जिल्हाधिकारी कार्यालयात नोटांच्या शंका निरसनासाठी बँक प्रतिनिधी!

Next

अकोला, दि. १७- चलनातून रद्द करण्यात आलेल्या ५00 व १000 रुपयांच्या नोटांसंबंधी नागरिकांच्या तक्रारी व शंकांचे निरसन करण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना (एलडीएम) पत्र दिले आहे.
५00 व १000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याचे केंद्र सरकारमार्फत गत ८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यानंतर ५00 व १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासंबंधी रुग्णालये, औषधी दुकाने, पेट्रोल पंपबाबत होणार्‍या तक्रारी तसेच एटीएम सुविधा बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात येतात. त्यानुषंगाने यासंबंधीच्या विविध तक्रारी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित ठेवण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे दिले आहेत.

Web Title: Bank representative for the removal of the notice of the collector's office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.