बँकेच्या संपात अकोला विभागातील दीडशे अधिकाऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 06:16 PM2018-12-21T18:16:18+5:302018-12-21T18:16:26+5:30
अकोला : तीन राष्ट्रीयकृत बँकेच्या विलीनीकरणास विरोध आणि ईतर प्रलंबित मागण्यासाठी शुक्रवारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संप पुकारला. अकोला -वाशिम ...
अकोला : तीन राष्ट्रीयकृत बँकेच्या विलीनीकरणास विरोध आणि ईतर प्रलंबित मागण्यासाठी शुक्रवारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संप पुकारला. अकोला -वाशिम जिल्हा विभागातील दीडशे अधिकारी या संपात सहभागी झाले होते.आॅल इंडिया बँक आॅफीसर्स कॉल कॉन्फीडरेशनच्या दोन संघटना सहभागी झाल्या होत्या. टावर चौकातील स्टेट बँकेच्या कार्यालयासमोर नारेबाजी करून शुक्रवारी अधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला.
शुक्रवारी छेडण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीयकृत बँकेच्या संपात लिपीक आणि ईतर कर्मचारी सहभागी झाले नव्हते. मात्र अधिकारी संपावर असल्याने शुक्रवारी बँकेतील कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. लिपीक आणि ईतर कर्मचारी शुक्रवारी संपावर नसले तरी त्यांचा या संपाला जाहिर पाठिंबा होता. अकोला-वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत १६ बँका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. केवळ प्रशासकीय अधिकारी आणि लिपीक कर्मचारी संपात सहभागी नव्हते. पण, सकाळपासून अनेक बँका उघडल्याच नाही. अकोला विभागीय अध्यक्ष दिलीप देशमुख, कोषाध्यक्ष गजानन पवार, पराग देशमुख या अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले.
२६ डिसेंबरच्या आंदोलनात ९ संघटनांचा सहभाग
राष्ट्रीयकृत बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे छेडलेल्या २६ डिसेंबरच्या आंदोलनात एकूण ९ संघटना सहभागी होणार आहे. यामध्ये ५ कर्मचार्यांच्या तर ४ अधिकाऱ्यांच्या संघटना सहभागी होणार आहे. २१ डिसेंबर आणि २६ डिसेंबर रोजी छेडलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्या माणूस पाच दिवस आर्थिक कोंडीत पकडल्या जाणार असल्याचे चित्र आहे.