थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँका तयार करणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:09 PM2020-01-05T12:09:21+5:302020-01-05T12:12:07+5:30
कर्जमाफीसाठी तयार करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांमार्फत तयार करण्यात येणार आहेत.
राज्यातील शेतकºयांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात २१ डिसेंबर रोजी केली होती. शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानुषंगाने ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांच्या याद्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत तयार करण्यात येणार आहेत. कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम १ फेबु्रवारीपर्यंत पूर्ण करावयाचे असून, कर्जमाफीसाठी तयार करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.
बँक खाते ‘आधार’शी ‘लिंक’ करणे आवश्यक!
कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ असलेल्या आणि बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ नसलेल्या शेतकºयांच्या याद्या बँकांमार्फत ७ जानेवारीपर्यंत तयार करण्यात येणार असून, बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ नसलेल्या शेतकºयांचे खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात येणार आहेत.
कर्जमाफी योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या थकबाकीदार शेतकºयांच्या याद्या १ फेबु्रवारीपर्यंत बँकांमार्फत तयार करण्यात येणार आहेत.
-डॉ. प्रवीण लोखंडे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), अकोला.