बोगस केळी रोप प्रकरणात ग्राहक मंचचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 08:36 PM2017-08-08T20:36:04+5:302017-08-08T20:38:36+5:30
अकोला: अकोट तालुक्यातील शेतकर्यांना केळीची बोगस रोपे देणार्या इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना ग्राहक मंचाने दोषी ठरवत शेतकर्यांना प्रत्येकी ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोट तालुक्यातील शेतकर्यांना केळीची बोगस रोपे देणार्या इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना ग्राहक मंचाने दोषी ठरवत शेतकर्यांना प्रत्येकी ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
अकोटसह आंबोडा, बोर्डी येथील शेतकर्यांना इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश अकोटकर आणि त्यांचे एजंट चंद्रकांत श्रीराम पालखडे व दिलीप सुखदेवराव अकोटकर यांनी शेतकर्यांना इंद्रायणी जी-९ या जातीचे दज्रेदार, देशातील पहिल्या क्रमाकांचे केळी टिश्यु कल्चर असल्याचे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून परिसरातील अनेक शेतकर्यांनी या रोपांची खरेदी केली होती. ही खरेदी करत असताना शेतकर्यांना विविध कंपन्यांच्या पावत्या देण्यात आल्या. शेतकर्यांनी शेती मशागत करून शेणखत, सेंद्रिय खत व इतर खर्च करून या रोपांची पेरणी केली होती. योग्य मशागत करूनही पिके चांगली आली नसल्याने शेतकर्यांनी इंद्रायणीचे संचालक व एजंट यांना शेतात येऊन मोकापाहणी करण्याची मागणी केली; मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने शेतकर्यांनी कृषिमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, उपविभागीय अधिकारी आदींसह इतरांना निवेदन दिले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासन व प्रशासनाने तक्रार निवारण समितीची नियुक्ती केली होती. यामध्ये ५ कृषी तज्ज्ञ सदस्यांचाही समावेश होता. या समितीने प्रत्यक्ष शेतकर्यांच्या शेतात जाऊन मोका पाहणी केली होती. तसेच त्यामध्ये शेतकर्यांचे ७0 टक्के केळी पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला होता. या प्रकरणी शेतकर्यांनी ग्राहक मंचातही धाव घेतली होती. शेतकर्यांच्या याचिकेवर सुनावणी करीत ग्राहक मंचाने शेतकर्यांची फसवणूक केल्याप्रकरणी इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना दोषी ठरवून शेतकर्यांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ३0 हजार व न्यायालयनीन खर्च ३ हजर असा ३३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत ही रक्कम शेतकर्यांना द्यावी लागणार आहे. रक्कम अदा न केल्यास ८ टक्के दराने व्याजदर लावावा, असेही ग्राहक मंचाच्या त्रिसदस्यीय पीठाने आपल्या निकालात म्हटले आहे. या प्रकरणी तक्रारकर्त्या शेतकर्यांच्या वतीने अँड. रवींद्र पोटे व अँड.एस.बी. पाटील यांनी काम पाहिले.