बापरे, मनपाचा आस्थापना खर्च ५० टक्क्यांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:24 AM2021-09-17T04:24:12+5:302021-09-17T04:24:12+5:30
काेंडवाडे रिकामे,जनावरे रस्त्यावर! आज राेजी शहरातील मुख्य रस्ते, चाैकांमध्ये माेकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याचे चित्र आहे. यामुळे अपघातात वाढ झाली ...
काेंडवाडे रिकामे,जनावरे रस्त्यावर!
आज राेजी शहरातील मुख्य रस्ते, चाैकांमध्ये माेकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याचे चित्र आहे. यामुळे अपघातात वाढ झाली आहे. हद्दवाढीनंतर महापालिकेचे पाच पटीने भाैगाेलिक क्षेत्रफळ वाढल्यानंतरही माेकाट जनावरांसाठी केवळ दाेन काेंडवाडे सुस्थितीत आहेत.
माेकाट वराहांचा अकाेलेकरांना वैताग
शहराच्या गल्लीबाेळात माेकाट वराहांचा मुक्त संचार अकाेलेकरांसाठी डाेकेदुखी ठरू लागला आहे. तत्कालीन आयुक्त निमा अराेरा यांनी वराह पकडण्याची माेहीम एकाच दिवसांत गुंडाळल्याने वराह पालकांचा काॅन्फीडन्स दुप्पट झाला आहे.
आठव्या जलकुंभाची उभारणी कधी?
‘अमृत अभियान’अंतर्गत शहरात आठ जलकुंभांची उभारणी करणे ‘एपी अॅन्ड जीपी’कंपनीला बंधनकारक हाेते. कंत्राटदाराने सात जलकुंभ उभारल्यानंतर आठवा जलकुंभ उभारणे शक्य नसल्याचे पत्र प्रशासनाला दिले. त्यावर प्रशासनाने पुढे काेणतीही कारवाई केली नाही, हे विशेष.
पथदिवे बंद, विभाग झाेपेत
ऐन सणासुदीच्या दिवसांत शहराच्या विविध भागातील एलइडी पथदिवे नादुरुस्त झाले आहेत. कंत्राटदाराने चाेवीस तासाच्या आत पथदिव्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित असताना तसे हाेत नसल्याने मनपाचा विद्युत विभाग झाेपा काढण्याचे कर्तव्य बजावताे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.