बाप्पा.. पुढच्या वर्षी लवकर या!

By admin | Published: September 16, 2016 03:15 AM2016-09-16T03:15:15+5:302016-09-16T03:15:15+5:30

गणेशभक्तांच्या आर्जवाचा स्वीकार करीत दरवर्षी येणा-या गणरायांनी गुरुवारी निरोप घेतला

Bappa .. Come this year next! | बाप्पा.. पुढच्या वर्षी लवकर या!

बाप्पा.. पुढच्या वर्षी लवकर या!

Next

अकोला, दि. १५ - ओसांडून वाहणारा गणेश मंडळांचा उत्साह, ढोलताशे व झांज यांचा गजर, गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष व गेल्या पाच आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे आगमन अशा मनोहरी वातावरणात पुढच्या वर्षी लवकर या.. अशा गणेशभक्तांच्या आर्जवाचा स्वीकार करीत दरवर्षी येणार्‍या गणरायांनी गुरुवारी निरोप घेतला. जिल्हाभरात १,७९१ व शहरातील ६८४ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकींना सकाळीच प्रारंभ झाला. अकोल्यात मानाच्या बाराभाई गणपतीची विधिवत पूजा करून सुरू झालेली मिरवणूक गणेश भक्तांच्या उत्साहाने ओसांडून वाहत होती. अकोल्यातील मानाच्या समजल्या जाणार्‍या बाराभाईच्या गणेश मूर्तीचे पूजन गुरुवारी सकाळी ११.00 वाजता जयहिंद चौकात झाले. महाआरती आणि पूजनानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर जयहिंद चौकातून अगरवेसकडे ११.१५ वाजता मिरवणूक निघाली.

रात्री १२ वाजेनंतर झाला मिरवणुकीचा समारोप !
रात्री बारा वाजता ताजनापेठ पोलीस चौकींसमोर मिरवणुकीच्या समारोप कार्यक्रमाला सुरूवात झाली व अध्र्या तासामध्ये कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी जी.ङ्म्रीकांत व पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांचा सत्कार करण्यात आला. मीणा यांनी नागरिक, शांतीदूत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांचे आभार मानले. रात्री १२ वाजेपर्यंत २८ गणेश मंडळांनी ताजनापेठ चौकातून गणेश घाटाकडे प्रस्थान केले होते. मिरवणुकीतील उर्वरित मंडळ यानंतर गांधीग्रामकडे गणेश विसर्जनासाठी रवाना झाले.

तडीपार केलेल्या आरोपीस अटक
गणेशोत्सवादरम्यान तडीपार करण्यात आलेला आरोपी शेख रज्जाक शेख सुलतान (१९ रा. पंचशीलनगर, खरप रोड) हा पोलिसांना गस्तीदरम्यान घरी मिळाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. शेख रज्जाक याला उपविभागीय अधिकार्‍यांनी त्याला १२ ते १६ सप्टेंबरदरम्यान शहरातून तडीपार केले होते.

Web Title: Bappa .. Come this year next!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.