लाचखोर ग्रामसेवकाला अटक

By admin | Published: August 8, 2014 11:37 PM2014-08-08T23:37:29+5:302014-08-09T01:21:35+5:30

रिसोड तालुक्यातील हनवतखेडा ग्राम पंचायत येथील ग्रामसेवकासह त्याच्या हस्तकास रंगेहात अटक.

Barker Gramsevak arrested | लाचखोर ग्रामसेवकाला अटक

लाचखोर ग्रामसेवकाला अटक

Next

वाशिम : ग्राम पंचायत रेकॉर्डमध्ये जागेची नोंद करण्यासाठी कर्मचार्‍याच्या माध्यमातून सात हजाराची लाच मागणार्‍या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने रंगेहात पकडल्याची घटना मालेगाव तालुक्यातील हनवतखेडा येथे ८ ऑगस्ट रोजी घडली.या प्रकारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली.
मालेगाव पंचायत समिती अंतर्गत हनवतखेडा ग्राम पंचायत येथील ग्रामसेवक शिवाजी लक्ष्मण कांबळे यांनी गावातीलच एका इसमाला त्याच्या जागेची ग्राम पंचायत मध्ये नोंद करण्यासाठी सात हजार रूपयांची मागणी केली. लाचेची रक्कम ग्राम पंचायत कर्मचारी सुरेश राजाराम वानखडे याचेकडे देण्याचे सांगीतले.
जागेची नोंद करण्यासाठी ग्रामपंचायतच्या चकरा टाकणार्‍या त्या इसमाने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात ७ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज ८ ऑगस्ट रोजी हनवतखेडा ग्राम पंचायत परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने सापळा रचला व तक्रारदाराकडून कांबळे याचा हस्तक सुरेश वानखडे लाच स्विकारत असताना रंगेहाळ पकडले. नंतर लगेच अँन्टी करप्शनच्या पथकाने ग्रामसेवक कांबळे याला ताब्यात घेतले.

Web Title: Barker Gramsevak arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.