बॅरेज झाले पण सिंचनाला पाणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 06:19 PM2020-02-09T18:19:00+5:302020-02-09T18:19:12+5:30
गतवर्षी या बॅरेजमध्ये पाणी साठविण्याचा प्रयोग करण्यात आला पण हे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही.
अकोला: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवटच असून, पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिन्या कामाला आणखी किती वर्ष लागतील हे सांगता येत नाही. गतवर्षी या बॅरेजमध्ये पाणी साठविण्याचा प्रयोग करण्यात आला पण हे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही.
पूर्णा बॅरेज-२ खारपाणपट्ट्यातील बॅरेज असून, हे बॅरेज बांधून झाल्यास नेरधामणा व या भागातील गावच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तद्वतच अकोलेकरांसाठीही बॅरेजमध्ये पिण्याच्या पाण्याचे आरक्षण राहील; परंतु अद्याप या बॅरेजचे काम पूर्ण झाले नाही. गतवर्षी सप्टेंबरपर्यंत बॅरेजला १२ वक्रद्वार लावण्याचा आले. पंरतु त्यासाठी येथे वीजच नाही. वक्रद्वार जरी लावले तरी शेतकºयांना सिंचनासाठी सध्यातरी पाणी मिळणे कठीणच आहे. शेतापर्यंत पाणी नेण्यासाठीची भूमिगत जलवाहिनीचा नकाशाच तयार नाही. या कामाला ११६ कोटीवर खर्च आहे. याकामासाठी अद्याप निविदा मागविण्यात आल्या नसल्याचे वृत्त आहे.
कवठा बॅरेजच्या कामातही अडथळा आला आहे. या भागातील लोहारा पुलाचे काम थंड बस्त्यात असल्याने या बॅरेजचे पाणी शेतकºयांना केव्हा उपलब्ध होणार, हा प्रश्नच आहे. कारंजा रमजानपूर प्रकल्पाचे काम पूर्ण झालेच नाही, उमा बॅरेजचे काम ठप्प आहे. काटीपाटी प्रकल्पाला लागणारी सुधारित प्रशासकीय मान्यता शासन दरबारी रखडली आहे. नेरधामणा (पूर्णा-२) बॅरेजचे तर काम जवळपास पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे भूमीगत जलावाहिनी टाकण्याअगोदर पंप हाऊस बांधण्याची गरज आहे.पंरतु तेहा काम रखडले आहे.याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकºयांचे म्हणने आहे.
पंप हाऊस व नलिका वितरण प्रणालीच्या निविदा या महिन्यात काढण्यात येणार आहे.त्यांनतर कामाला सुरू वात होईल.एक ते दोन वर्षात हे काम पूर्ण होईल अशी शक्यता आहे.
- मनोज बोंडे,
उपविभागीय अभियंता,
पाटंबधारे विभाग,
अकोला.