बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र विहिरीत पडलेल्या बिबट्याला दिले जीवनदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:00 AM2018-02-08T02:00:34+5:302018-02-08T02:02:47+5:30
सायखेड : बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत साखरविरा गावापासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या मोहन राठोड यांच्या शेतातील विहिरीत ७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजता पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला. त्या बिबट्याला वन विभागाच्या कर्मचार्यांसह पक्षीमित्राने रात्री ११ वाजता बाहेर काढून जीवनदान दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क

मोहन राठोड यांच्या विहिरीत बुधवारी सायंकाळी बिबट्या पडल्याची माहिती त्यांनी वन विभागाला तातडीने कळविली. त्या माहितीनुसार अकोल्याचे पक्षीमित्र मुन्ना शेख, बार्शीटाकळीचे वन परिक्षेत्राधिकारी विवेक लाड यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी बिबट्या पडलेल्या विहिरीत एक दोरांचे जाळे व खाट सोडली. दरम्यान बिबट्या विहिरीच्या एका कपारीत जीवाच्या भीतीने लपून बसला होता. तो बाहेर येत नव्हता त्यामुळे पक्षीमित्र मुन्ना शेख व अन्य एक जण जिवावर उदार होऊन विहिरीत उतरले. त्यांनी प्रयत्नपुर्वक सदर बिबट्याला जाळ्यात अडकवून विहिरीतून बाहेर काढले त्यानंतर त्याला मोकळे सोडताच तो लगेच जंगलात पळून गेला.