बेताल ऑटोंना लागणार शिस्त!
By admin | Published: September 21, 2014 01:50 AM2014-09-21T01:50:02+5:302014-09-21T01:50:02+5:30
अकोला पोलिसांचा अँक्शन प्लॅन : अधिकारी व ऑटो चालकांचा सभेत निर्णय.
अकोला - ऑटोचालकांच्या बेशिस्तीमुळे शहरातील वाहतूक वारंवार खोळंबत असून, या प्रकाराला दुसरे कारण खासगी ऑटोही असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यापुढे शहरात खासगी ऑटोंना प्रवासी वाहतूक करण्यास बंदी करण्याचा निर्णय पोलिस अधिकारी व ऑटोचालकांच्या सभेत घेण्यात आला. यासोबतच शहरातील बेताल वाहतूक ताळय़ावर आणण्यासाठी बेशिस्त वाहनांवर कारवाईसाठी शनिवारपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
शहरात प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवाना असलेल्या ऑटोचालकांना प्रवासी वाहतूक करताना गणवेश, ऑटोचा परवाना व इतर महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे त. मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोर ऑटो उभे करण्यात येऊ नये, समोरील सिटवर प्रवाशांना बसवू नये, यासह महत्त्वाच्या सूचना ऑटोचालकांना देण्यात आल्या आहेत. या नियमांचे पालन करणार्या ऑटोचालकांवर कारवाई करण्यात येणार असून, खासगी ऑटोचालकांनी शहरात ऑटो चालविल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिला.