संविधानातील मूलभूत तत्त्वे जनमानसात रुजवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:14 AM2020-12-27T04:14:14+5:302020-12-27T04:14:14+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, अकोला व पातूर तालुक्यातील समतादूत समता तायडे यांच्या वतीने स्त्रीमुक्ती ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, अकोला व पातूर तालुक्यातील समतादूत समता तायडे यांच्या वतीने स्त्रीमुक्ती दिनानिमित्त व बार्टी संस्थेच्या ४२व्या वर्धापदिनानिमित्त ऑनलाइन प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डाॅ. प्रकाश पवार यांनी मार्गदर्शन केले.
स्त्रीमुक्ती दिन हाच खरा भारतीय महिला दिना म्हणून साजरा केला पाहिजे. आजच्या दिवशीच मनुस्मृतीच्या विषमतावादी रुढी परंपरांची होळी करून खऱ्या अर्थाने समतावादी विचारांची पायाभरणी करण्यात आली. भारतीय महिलांनी याचे महत्त्व जाणून संविधान जनजागृती करण्यासाठी नेहमी सजग असले पाहिजे, असेही डाॅ. पवार म्हणाले. पातूर तालुका समतादूत समता तायडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक अधिकारी विजय बेदरकर यांनी केले.
.............................
राज्यातील समतादूतांचा सहभाग
स्त्रीमुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वैचारिक बांधिलकी जपणारे मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अकाेल्याचे प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर, वाशिमचे प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे, अमरावतीचे अधिकारी विजय वानखेडे, लातूरचे बलभीम सुरवसे, प्रज्ञा खंदारे यांच्यासह राज्यातील समतादूत या उपक्रमात सहभागी झाले हाेते.