दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना ‘अथार’ चा आधार !

By admin | Published: June 24, 2016 11:43 PM2016-06-24T23:43:14+5:302016-06-24T23:43:14+5:30

पेरणीसाठी मदतीचा हात; शेतक-यांना दिले जाते जेवण.

The basis of 'Athar' basis for the farmers in drought situation! | दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना ‘अथार’ चा आधार !

दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना ‘अथार’ चा आधार !

Next

नाना हिवराळे / खामगाव
गेल्या तीन वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच महागाईने कंबरडे मोडले असून खरिपातील पेरणीच्या सोयीसाठी शेतकरी प्रयत्नरत आहेत. दरम्यान, पेरणीसाठी वाढलेला खर्च शेतकर्‍यांना झेपावणारा नसल्यामुळे ग्रामीण भागातील पेरणीची अथार ही पद्धत शेतकर्‍यांना आधार ठरणार आहे.
शेताची नांगरणी, वखरणी, पेरणी आदी सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. बैलाची संख्या कमी असल्याने पेरणीचा अवाजवी खर्च शेतकर्‍यांना पेलावा लागत आहे. सायळ पद्धतीने पेरणी केली जात असे यामुळे पेरणीच्या खर्चाची बचत होत असे; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. दुसर्‍याकडून पेरणी करताना शेतकर्‍यांना ट्रॅक्टरने ४00 रुपये प्रती एकर तर बैलजोडीने ७00 रुपये एकर किंमत मोजावी लागत आहे. अगोदरच सततच्या दुष्काळाने शेतकरी पार खचला आहे. गत तीन वर्षांपासून शेतीतून पेरणीच्या खर्चाऐवढेही उत्पन्न निघाले नसल्याने दरवर्षी कर्जाचे पुनर्गठन सुरू आहे. यामुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला आहे. बी-बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
ग्रामीण भागात फार पूर्वीपासून पेरणीची अथार पद्धत प्रचलित होती; मात्र काळाच्या ओघात काही प्रमाणात ती मागे पडली आहे. परंतु सद्यस्थितीत हीच अथार पद्धत शेतकर्‍यांना आधारवड ठरू शकते. गावातील ज्या शेतकर्‍याकडे पेरणीसाठी बैलजोडी नसेल व त्यांची आर्थिक स्थिती नाजूक असेल तर अशा शेतकर्‍यांची शेती पडीक राहू नये याकरिता इतर शेतकरी त्या शेताची पेरणी करीत असत. या पेरणीसाठी लागणार्‍या खर्चाची रक्कम न घेता त्या शेतकर्‍याजवळून केवळ मोबदला म्हणून एक वेळचे जेवण घेतले जायचे. यामुळे गरीब शेतकर्‍यांना अथार पद्धतीचा आधार होत असे.

Web Title: The basis of 'Athar' basis for the farmers in drought situation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.