वीजबिल चेकने देत असाल तर सावधान; बाउन्स झाल्यास ८८५ रुपयांचा दंड

By atul.jaiswal | Published: August 10, 2021 10:47 AM2021-08-10T10:47:28+5:302021-08-10T10:50:47+5:30

MSEDCL News : धनादेश अनादरित झाल्यास विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

Be careful if you pay the electricity bill by check; A fine of Rs 885 for bouncing | वीजबिल चेकने देत असाल तर सावधान; बाउन्स झाल्यास ८८५ रुपयांचा दंड

वीजबिल चेकने देत असाल तर सावधान; बाउन्स झाल्यास ८८५ रुपयांचा दंड

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात १०० ते १२५ चेक होतात बाउन्स ऑनलाइन बिल भरणे सोयीचे

- अतुल जयस्वाल

अकोला : विद्युत वापरापोटीचे देयक भरण्यासाठी विविध ऑनलाइन पर्याय उपलब्ध असतानाही अनेक ग्राहक धनादेशाद्वारे (चेक) देयक अदा करतात. हा धनादेश अनादरित झाल्यास विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

जिल्ह्यातील एकूण वीजग्राहकांपैकी तीन हजारांवर ग्राहका बिल भरण्यासाठी धनादेश किंवा धनाकर्षाचा वापर करतात. अनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येत आहे. धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधित रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असल्याचे आढळून येत आहे. धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीजबिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीजबिलामध्ये थकबाकी दिसून येते.

 

महिन्याला १००वर चेक परत

जिल्ह्यात अनेक जण धनादेशाद्वारे वीजबिल भरतात. चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधित रक्कम नसणे आदी कारणांवरून महिन्याकाठी १०० ते १२५ धनादेश परत करावे लागत असल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली.

असा आकारल्या जातो दंड

धनादेश अनादरित झालेल्या ग्राहकांना प्रत्येक वीजबिलासाठी ७५० रुपये, बँक ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५ रुपये असे एकूण ८८५ रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.

 

जिल्ह्यातील वीजग्राहक

घरगुती - ३,१५, १८५

औद्योगिक - ५०६०

कृषी - ६३,९४०

ऑनलाइन पेमेंट करणारे - ८६,६६४

प्रत्यक्ष काउंटरवर जाऊन पैसे भरणारे - १,२७,४२५

चेक अथवा डीडीद्वारे बिल भरणारे - ३५०२

थकीत देयके

घरगुती -८८,८२,८९,८४८

औद्योगिक -६,४२,८४,७२९

कृषी - ४,७४,२४,५००

 

धनादेश अनादरित झाल्यास ग्राहकाची धनादेशाची सोय सहा महिन्यांकरीता निलंबित करण्यात येते. शिवाय बिल न मिळाल्याने वीजपुरवठाही खंडित होतो. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन पर्याय स्वीकारून वीजबिल भरावे व विविध सुविधांचा लाभ घ्यावा.

- पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ, महावितरण

Web Title: Be careful if you pay the electricity bill by check; A fine of Rs 885 for bouncing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.