सावधान! काेराेना कमी झाला, संपला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:15 AM2021-06-25T04:15:07+5:302021-06-25T04:15:07+5:30
‘त्या’ चुका पुन्हा का करताय? भाजीबाजार निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करीत भाजीबाजार सुरू झाला; परंतु आता या ...
‘त्या’ चुका पुन्हा का करताय?
भाजीबाजार
निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करीत भाजीबाजार सुरू झाला; परंतु आता या ठिकाणी नियमांचा फज्जा उडत आहे. विक्रेत्यांच्या तोंडाला मास्क दिसून येत नाही. केवळ दोन-चार विक्रेते मास्क घालून असतात.
ही स्थिती डाबकी रोड भागातील, जैन मंदिर-ताजनापेठ रस्त्यांवरील भाजीबाजारात दिसून येत आहे.
किराणा बाजार
शहरातील किराणा बाजारात दररोज वर्दळ असते. या ठिकाणीच कोविड नियमांचे पालन होत नाही. भाजीबाजाराप्रमाणे येथेही नागरिक गर्दी करीत आहे. एक छोट्या दुकानासमोर सहा-सात ग्राहक सोशल डिस्टन्सिंग न पाळता उभे राहतात. शहरातील काही किराणा दुकानांमध्ये चिक्कार गर्दी होत आहे.
बसस्थानक
शहरातील आगार क्रमांक २ मधून बसेसची प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. त्यामुळे येथे गर्दी वाढली आहे. या ठिकाणी उपस्थित निम्म्यापेक्षा अधिक प्रवासी हे विनामास्क असतात. सोशल डिस्टन्सिंग पाळून बसत नाही. महामंडळाच्या कर्मचारी प्रवाशांना वारंवार मास्क घालण्याच्या सूचना देत आहे. हा हलगर्जीपणा बसेसमध्ये बसल्यावरही असतो.
ऑटोरिक्षा
नो मास्क, नो सवारी मोहीम राबविणारे ऑटोचालक स्वत:चा मास्क घालत नसल्याचे निदर्शनास आले. त्यात ना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होते ना मास्क लावला जातो. प्रवाशांनी गच्च भरून ऑटो रस्त्यांवरून धावत आहेत. बहुतांश ऑटो चालकांचे मास्क हनुवटीवर आले आहे.
सॅनिटायझरची बॉटल झाली प्रदर्शनार्थ ठेवलेली वस्तू
कोरोनाच्या भयानकतेने रुग्णवाढीच्या काळात नागरिकही मोठी दक्षता घेत होते. आता पुन्हा रुग्णसंख्या कमी होत असल्याने प्रशासनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. समोर सॅनिटायझरची एक बॉटल प्रदर्शनार्थ ठेवलेली वस्तू असल्यासारखी दिसून येत आहे.